जबलपूर (मध्य प्रदेश): जबलपूरमध्ये नैसर्गिक विधीसाठी बसलेल्या एका व्यक्तीवर तब्बल १३ फूट लांबीच्या अजगराने हल्ला केला. या अजगराने माणसाची मान घट्ट आवळल्यानंतर त्याला गिळण्याचा प्रयत्न केला. या थरारक घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्या व्यक्तीचा जीव कसा बसा वाचला आहे.
एक व्यक्ती झुडपांमध्ये शौचास बसल्यानंतर एका १३ फूट लांबीच्या अजगराने त्याच्यावर हल्ला करत त्याची मान आवळली. यावेळी या व्यक्तीने अजगराचे तोंड पकडून सुमारे २० मिनिटे त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही. यावेळी त्याने अजगराचे तोंड हाताने घट्ट पकडून ठेवले होते. दुसरीकडे अजगर व्यक्ती भोवती आवळलेला फास आणखी घट्ट करत होता. त्याला त्याची सुटका करता न आल्याने त्याने आरडा ओरडा केला. त्याचा आवाज ऐकून आजू बाजूचे नागरिक धावून आले. आरडाओरडा ऐकून ग्रामस्थ तेथे पोहोचले असता त्यांना धक्का बसला. अजगराने त्या व्यक्तीला वेटोळे घातले असल्याचे दिसले. नागरिकांनी त्या व्यक्तीची सुटका करण्यासाठी अजगराला काठ्या, दांडके, कुऱ्हाडीने मारहाण करण्यास सुरवात केली. अजगराला तलवारीने कापून ठार मारले. अजगराचे तुकडे करून व्यक्तीचे प्राण वाचवले. संबंधित घटनेचा व्हिडिओ गावातील एका व्यक्तीने सोशल मीडियावर अपलोड केला आहे. जबलपूरच्या कुंडम तहसीलच्या बगराजी गावातील कल्याणपूर येथील १७ जुलै रोजी ही घटना आहे.
मध्य प्रदेश के जबलपुर में शौच करने बैठे एक शख्स पर 13 फुट लंबे अजगर ने अटैक कर दिया। अजगर ने शख्स की गर्दन को बुरी तरह जकड़ लिया और उसे निगलने की कोशिश करने लगा। कैसे बची शख्स की जान? खौफनाक VIDEO…#viralvideo #viralnews #MPNews #MadhyaPradeshNews pic.twitter.com/OtrEaCDgqW
— Krishna Bihari Singh (@KrishnaBihariS2) July 21, 2024
दुसरीकडे, अजगराला कसे आटोक्यात आणायचे याची माहिती गावकऱ्यांना नसल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे अजगराला मारावे लागले. इच्छा नसताना अजगराला मारल्याचेही गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांनी तसे केले नसते तर युवकाची सुटका करणे कठीण झाले असते. हळुहळू अजगर तरुणाचा फास आवळत होता. थोडा उशीर झाला असता तर तरुणाला जीव गमवावा लागला असता. वनविभागाने पंचनामा करून अजगराला गावाबाहेर वनजमिनीत पुरले आहे.
Video: दारूचे व्यसन सोडवायला गेला अन् मिळाला खतरनाक ‘प्रसाद’…
Video: एसटी बसमध्ये 2 वृद्धांमध्ये चप्पलेने हाणामारी…
Video: युवतीची आई म्हणते, लग्नासाठी मुलगा पटव पण कसा पटवू…