शिरूर तालुका

शिरूर! आई-वडिलांचे भांडण अन् चिमुकल्याचा बिबट्याने घेतला जीव…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे बिबट्याच्या हल्ल्यात वंश राजकुमार सिंग (वय ७ वर्ष) या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील गोकुळनगर-दगडवाडी रोड वरील संदिप अशोक घाडगे यांच्या मालकीच्या वाघेश्वर गूळ उद्योग येथे मजुरी साठी वास्तव्यास असलेल्या राजकुमार सिंग मूळ (रा. मुज्जफरनगर, दिल्ली) यांचा मुलगा वंश राजकुमार सिंग (वय ७ वर्ष) हा त्याच्या आई व वडील यांचे घरघुती वादावेळी वडील हे आई रेखा हिस मारावयास धावले असता वंश हा घराच्या बाजूला असलेल्या उसाचे शेतात घाबरून पळाला होता.

शुक्रवारी (ता. १८) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तेथील शेतात दडून बसलेल्या बिबट्याने सावज समजून त्याच्यावर अचानक प्राण घातक हल्ला केला. त्यावेळेस त्याचे वडील राजकुमार सिंग यांनी आरडा-ओरडा करून बिबट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने त्याला न जुमानता वंश यास सुमारे 400 फूट अंतरावरील उसाच्या शेतात फरपटत नेले. याबाबाबतची माहिती तेथील गुऱ्हाळ मालक संदिप घाडगे यांनी वन विभागाला दिली. वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी तात्काळ घटना स्थळी पोहचून मृत अवस्थेत असलेल्या वंश याचे शवाचे पाहणी करून परिसरातील वन्यप्राणी बिबटच्या अस्तित्वाची खात्री केली.

मृत वंशचे शव शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय, शिरूर येथे पाठविण्यात आले. घटना स्थळी जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी तात्काळ भेट दिली व पाहणी करून सरपंच व उपसरपंच व वनकर्मचारी यांच्याशी सदर घटने विषयी चर्चा करून मार्गदर्शन केले. सदर ठिकाणी हल्ला केलेल्या बिबट्याला पकडण्या करिता ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून त्याचा शोध घेऊन तात्काळ पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्याच्या सूचना दिल्या. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी 12 पिंजरे, 9 कॅमेरा ट्रॅप लावण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

दरम्यान, भीमा नदीच्या आजूबाजूच्या परिसरात बिबट्यांची असलेली मोठी संख्या आहे. हे लक्षात घेता, शेतातील व लगतच्या प्रत्येक घराभोवती भरपूर प्रकाश दिवे लावणे, घराभोवतीचे व शेत रस्त्याच्या दोन्ही बाजूचे संपूर्ण गवत काढून टाकणे, दिवस उगवण्यापूर्वी आणि मावळल्यानंतर शक्यतो घराबाहेर न पडणे, अपरिहार्य असल्यास सोबत टॉर्च व मोठी काठी बाळगणे या सुचनांचे गांभीर्याने पालन ग्रामस्थ यांनी करावे, असे कळकळीचे आवाहन जुन्नर वन विभागाकडून करण्यात येत आहे.

वाघाळे येथील उपसरपंचांच्या धाडसामुळे बिबट्या झाला जेरबंद; 16 कोंबड्यांचा पाडला फडशा…

जांबुत; बिबट्याच्या हल्यात महिलेचा मृत्यू ग्रामस्थ आक्रमक, गाव बंद ठेवुन पदयात्रा काढत केला रास्ता रोको

शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

शिरूर तालुक्यात बिबट्याचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला…

Video; शिरुर; बिबट्याची मादी कोंबडी खायला गेली अन खुराड्यात अडकली

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

20 तास ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

21 तास ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

1 दिवस ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

1 दिवस ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

2 दिवस ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

2 दिवस ago