मुख्य बातम्या

पुणे-शिरुर उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा; असा असणार प्लॅन…

शिरुर (तेजस फडके) पुणे ते शिरूरदरम्यान तब्बल ५४ किलोमीटर लांबीचा सहापदरी उड्डाणपूल महामार्ग उभारण्याच्या प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. निविदांची दरपत्रके अंदाजे ४६ टक्के जास्त दराने आल्याने हे काम आता डीबीएफओटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे-शिरूर कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून सहापदरीकरण आणि ठिकठिकाणी उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर उभारण्याच्या सूचना नुकत्याच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या होत्या. या निर्णयाला आता अधिकृत रूप मिळाले असून रस्त्याचे काम लवकरच प्रत्यक्षात सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.

पुणे-शिरूर उड्डाणपूलाचा प्रकल्प एनएचएआय किंवा एमएसआरडीसीऐवजी थेट महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाद्वारे राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने पूर्वीच घेतला होता. या प्रकल्पासाठी महामंडळाने मागविलेल्या निविदांना सुरुवातीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर या उड्डाणपुलासोबतच पुणे, छत्रपती संभाजीनगर ग्रीन कॉरिडॉरसाठी भूसंपादनाचा समावेश करून सुमारे ४,५०० कोटींच्या अंदाजपत्रकावर निविदा मागविण्यात आल्या आहेत. तसेच तीन कंपन्यांनी या निविदांना प्रतिसाद देखील दिला आहे. मात्र सर्व निविदा अंदाजपत्रकापेक्षा जवळपास ४६ टक्के महाग आल्या आहेत. त्यामुळे महामंडळाने प्रकल्प डीबीएफओटी पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेतला असून त्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. ही पद्धत वापरल्यास शासनाचा प्रारंभिक खर्च कमी होऊन प्रकल्प उभारणीस गती मिळणार आहे.

उड्डाणपुलाच्या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च ६,८४० कोटी रुपये इतका अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे काम चार वर्षांत पूर्ण करण्याचे बंधन कंत्राटदार कंपनीवर असेल. काम पूर्ण झाल्यानंतर कंपनीला पुढील ३० वर्षे टोल वसुलीचा अधिकार देण्यात येणार आहे. टोल उत्पन्नातील ५० टक्के हिस्सा कंपनीला तर उर्वरित ५० टक्के महामंडळाला मिळणार आहे. तसेच अपेक्षेपेक्षा जास्त टोल महसूल मिळाल्यास अतिरिक्त उत्पन्नातील ७५ टक्के रक्कम महामंडळाला हस्तांतरित करावी लागणार आहे, अशी अटही ठेवण्यात आली आहे. दरम्यान, पुढील चार वर्षांत उड्डाणपूल पूर्ण झाला तर पुणेकरांसह नगरहून पुण्याकडे येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळेल आणि नगर रोडवरील कोंडीचा प्रश्न कायमचा सुटू शकेल.

Video: पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीविरोधात शिक्रापूरकर उतरले रस्त्यावर…

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तिन्ही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करावे

पुणे-शिरूर सहापदरी कॉरिडोर प्रकल्पाबाबत मोठी माहिती…

छत्रपती संभाजीनगर ते पुणे नव्या महामार्गाचा मॅप व्हायरल…

पुणे आणि शिरूरचा सहा पदरी उड्डाण मार्गाला जोडला जणार समृद्धी महामार्ग; कोठून पाहा…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

16 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

16 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

16 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago