शिरूर तालुका

शिरूर तालुक्यात ग्रामस्वराज सप्ताहाच्या निमित्ताने चर्चासत्र संपन्न!

रांजणगाव गणपती : ग्रामीण स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे आयोजित विशेष जागरूकता व मार्गदर्शन शिबिरात न्यायव्यवस्था, दानवडणूक, कृषी व्यवस्थापन, आरोग्यदायी जीवनशैली आणि पक्षनिरपेक्ष लोकशाही अशा विविध विषयांवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शेतकरी, विद्यार्थी, ग्रामविकास अधिकारी, शिक्षक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

गावांना, शेतकऱ्यांना संपूर्ण स्वराज्य स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय स्वावलंबी गाव निर्माण होणार नाही. स्वावलंबी गावाचे विचारसरणीतूनच न्याय, पत्रकारिता, निवणडणूका यांची उत्तम व्यवस्था जन्माला येईल. जनतेमध्ये आज न्यायपालिका, निवणडणूका, पत्रकारिता याबाबत विश्वासहर्ता संकटात आली आहे, ही बाब चिंताजनक असल्याचे मत मान्यवरांनी चर्चासत्रात मांडले.

छत्रपतींच्या न्यायपद्धतीचा आदर्श…
न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी भाषणात सांगितले की, ‘आजही ग्रामीण भागात अनेक जुन्या प्रथा, अंधश्रद्धा आणि शोषण आधारित व्यवस्था टिकून आहेत. शेतकरी व कष्टकरी वर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायव्यवस्थेप्रमाणे संरक्षणाच्या प्रतिक्षेत आहे. गावांनी स्वावलंबन साधल्याशिवाय पूर्ण स्वराज्य शक्य नाही.’

अन्न, आरोग्य व नैसर्गिक आहाराचा आग्रह…
सचिदानंद जी (निसर्गोपचार तज्ञ) यांनी आरोग्यावरील मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, ‘जगातील कोणताही जीव शिजवलेले किंवा भाजलेले अन्न खात नाही. म्हणूनच त्यांचे आरोग्य अधिक सक्षम असते. नैसर्गिक, कच्चा व ताजा आहार हा मानवाच्या दीर्घकालीन आरोग्याचा पाया आहे. शिजवलेल्या अन्नातील जीवनशक्ती नष्ट होते. त्यामुळे शक्यतो नैसर्गिक आहार स्वीकारा.”

कृषी, अभ्यास व न्यायव्यवस्था…
लहानू कटके (केंद्रीय औद्योगिक न्यायाधिकरण, महाराष्ट्र–गोवा) यांनी विद्यार्थ्यांनी ग्रामीण न्यायव्यवस्थेचा अभ्यास कसा करावा, शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये कोणते मुद्दे महत्त्वाचे असतात याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

पक्षनिरपेक्ष लोकशाहीची गरज…
अशोक पटेल (गुजरात, पक्षमुक्त भारतचे अध्यक्ष) म्हणाले, ‘आजच्या स्थितीत लोकांचा रोष पाहता, दलगत लोकशाही व पक्षीय व्यवस्था लोकांच्या विश्वासाला तडा देत आहेत. पक्ष बाजूला ठेवून नागरिकांच्या थेट सहभागातून सरकार निर्माण झाले तरच खरी लोकशाही घडू शकते.’

कार्यक्रमास मोठी उपस्थिती…
कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी, महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये दीपक गायकवाड (कृषीतज्ञ), स्वराज दुनिया आणि सत्ता तंत्रचे सपांदक शिवाजी बबन खेडकर, जितेंद्र साळुंखे, कैवल्य बोरकर, मकरंद भालेराव, साहेबराव भाकरे, योगेश भाकरे, बाळकृष्ण मते, संकेत खेडकर, गुलाब नवले, निलेश नवले, राजेंद्र ढमढेरे, सतीश ढमढेरे, पोपट जगताप, राहुल गवारे, विवेक पवार, अजिंक्य हगुडे, महेश डुके, सुनिता खेडकर, बाळासाहेब साकोरे, संभाजी नरवडे, विठ्ठल बडे, शुभम करेकर, विवेक वीर, मनीषा पाटील व सर्व ग्राम विकास अधिकारी उपस्थित होते. अक्षय शेळके, दिपक सरोजे, सागर हळगुंडे, सचिन तपकिर, ज्ञानेश्वर कोरडे, जगन्नाथ डोंबळे, जर्नादन फांढरमिसे, शिवाजी चोरमले, सुरेश लोखंडे, राजकुमार कांबळे व महाविद्यालयीन विद्यार्थि उपस्थित होते.

पत्रकारांमध्ये विवेक वळसे, नितीन पवार, तेजस फडके, पोपट पाचंगे, प्रवीण लांडे तसेच अमोल अमळनारदकर व अमन अमळनारदकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कृषी तज्ञ दीपक गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

23 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

23 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

23 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago