मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यातील तलाठी, मंडल आधिकाऱ्यांकडून आर्थिक मलईसाठी नोंदी करण्यासाठी होतेय टाळाटाळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील तलाठी, मंडल आधिकाऱ्यांकडून आर्थिक मलईसाठी नोंदी करण्यासाठी टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.

शिरूर तालुका सधन तालुका म्हणून ओळखला जातो. पुणे-नगर हायवेलगत असणाऱ्या गावांमध्ये व तालुक्यात जमिन खरेदी-विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असतात. परंतु, त्या नोंदी करण्यासाठी तलाठी व मंडल आधिकारी आर्थिक मलईसाठी जाणीवपुर्वक टाळाटाळ करत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेकडो नोंदी रखडल्या आहेत. सगळी प्रक्रिया ऑनलाईन असून पैसे मिळाल्याशिवाय नोंदी टाकल्या जात नाही. ही अतिशय गंभीर बाब असून रखडलेल्या नोंदीची तातडीने चौकशी करून दोषी असणाऱ्या तलाठी व मंडल आधिकारी यांच्यावर जिल्हाधिकारी, प्रांत आधिकारी यांनी कारवाई करणे गरजेचे आहे.

शिरूर तालुक्यात बऱ्याच वर्षा पासून ठाण मांडून बसलेले काही मग्रुर तलाठी, मंडल आधिकारी चांगलेच गब्बर बनले असून ते वरीष्ठांचेही ऐकत नसल्याचे चित्र समोर येत आहे. तलाठी, मंडल अधिकारी कार्यालयात अनेक ठिकाणी ‘झिरो’ कार्यरत असून त्यांच्या मार्फत जोरदार वसुली होत आहे. वेळेत नोंदी न टाकणाऱ्या तलाठी व मंडल आधिकाऱ्यांवर आता वरीष्ठ अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. आता नवनिर्वाचित आमदार यांनीही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पैसे दिल्याशिवाय नोंदच होत नाही. तसेच काहीतरी थातूरमातूर कारण दाखवून नोंद रद्द करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. याला आळा न बसल्यास तहसिल कार्यालयासमोर याबाबत आंदोलन करण्याचा इशारा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
(क्रमश:)

Video: महसूल प्रशासन निवडणुकीत व्यस्त, वाळू माफिया चोरतात वाळू मस्त…

शिरुर तालुक्यात मारहाण करुन जबरी दरोडा; सोन्याच्या झुब्यासाठी महिलेचे कान कापले

जनता दल प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

पुणे-नगर महामार्गावर युवती किंवा महिलांना लिफ्ट देताय…? सावधान…

शिरुर-हवेली मतदारसंघात माऊली कटके यांचा दणदणीत विजय…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago