कारेगाव (तेजस फडके) राज्यामध्ये भाजप प्रणित महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याबद्दल जनता दल सेक्युलरचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मुंबई येथील सागर बंगल्यावर भेट घेऊन अभिनंदन केले. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनता दल सह महायुतीतील इतर घटक पक्षांच्या प्रमुखांनी भेट घेतली.
या भेटी दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मिळालेल्या महाविजयाबद्दल महायुतीतील घटक पक्षांचे आभार मानले. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, सरकार स्थापन झाल्यावर सरकारमध्ये सर्व घटक पक्षांच्या पदाधिकारी यांना सन्मानाची वागणुक भेटेल असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील घटक पक्षाच्या प्रमुखांना दिले.
शिरुर तालुक्यात मारहाण करुन जबरी दरोडा; सोन्याच्या झुब्यासाठी महिलेचे कान कापले
दिलीप वळसे पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट; निवडीविषयी म्हणाले
शिरुर-हवेली मतदारसंघात माऊली कटके यांचा दणदणीत विजय