शिंदोडी (तेजस फडके) : गेल्या महिनाभर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालु असल्यामुळे महसूल प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचा फायदा घेत चिंचणी येथील घोड धरणात वाळू माफिया सक्रीय झाले आहेत. यांत्रिक बोटींच्या साह्याने बेसुमार वाळू उपसा करण्याचा त्यांनी सपाटाच लावला आहे.
गेल्या महिनाभरापासुन राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालु असल्यामुळे शिरुर येथील महसूल विभागाचे सर्व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत वाळू माफियानी पुन्हा एकदा चिंचणी येथील घोड धरणातून यांत्रिक बोटींच्या साह्याने बेसुमार वाळू उपसा चालू केला आहे. त्यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे. नागरिकांना जे दिसते ते महसूल विभागाला का दिसत नाही? की दिसून आंधळेपणाचे सोंग आणले जाते, असा प्रश्न नागिरक विचारत आहेत. महसूल विभागाने तत्काळ कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
शिरुर; वाळु माफियांचा आणखीन एक कारनामा; तहसीलदार पाठीमागे लागताच रस्त्यावरच टाकली वाळू
चिंचणी येथील वाळूमाफीयांविरोधात जोरदार कारवाई करणार; तहसिलदार बाळासाहेब म्हस्के
घोड धरणातील वाळू चोरीबाबत महसुल विभागाच ‘वरातीमागुन घोड’ शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल
शिरुर; घोड धरणाची वाळू माफीयांनी लावलीये वाट; रात्रंदिवस वाळू उपशाचा घातलाय घाट
व्हिडीओ:- घोड धरणात रात्रीस वाळू उपशाचा चालतोय खेळ, प्रशासन सुस्त आणि वाळू चोर मस्त…