zero-to-hero
शिरूरः शिरूर तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करत असलले्या मान्यवरांनी भरारी घेतली असून, मोठ-मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. परंतु, या पदापर्यंत पोहचण्यापूर्वी अनेकांना बिकट परिस्थितीमधून जावे लागले आहे. अनेकांचा ‘झिरो टू हिरो’ हा प्रवास थक्क करणारा आहे. ईश्वरी प्रकाशन आणि www.shirurtaluka.comच्या वतीने ‘शिरूरचे झिरो टू हिरो’ या पुस्तकामधून अनेकांचा जीवनपट मांडला जाणार आहे.
दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जाणाऱ्या शिरूर तालुक्याने आज रोजी आपली ओळख पूर्णपणे बदलली आहे. शिरूर तालुक्यातील अनेकजण स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून आपला ठसा उमटवत आहेत. देश, राज्यातील उच्च पदांवर अनेकजण कार्यरत आहेत. शिरूर तालुक्याचे नाव मोठे करण्यात अनेकांचा मोठा वाटा आहे. शिरूर तालुक्यातून अनेक उद्योजक पुढे आले आहेत. विविध क्षेत्रांमध्ये अनेकांनी गरूड झेप घेतली आहे. पण, ही झेप घेत असताना अनेकांना खडतर प्रवासातून जावे लागले आहे. परिस्थितीशी दोन हात करून अनेकजण यशस्वी झाले आहेत. यामध्ये अनेक युवक, युवती, उद्योजकांचा समावेश आहे.
राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, प्रशासनामध्ये काम करत असताना अनेकांचा शिरूर तालुक्याचे नाव मोठे करण्यात सिंहाचा वाटा आहे. शिरूर तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या अथवा उद्योग-व्यवसायात भरारी घेतलेल्या मान्यवरांचे ‘शिरूरचे झिरो टू हिरो’ या पुस्तकातून जीवन प्रवास मांडला जाणार आहे. संबंधितांचे लेख हे अनेकांना दिशा देणारे ठरणार आहेत. शिवाय, सशुल्क पुस्तकातील माहिती www.shirurtaluka.com या वेबसाईटवरही घेतली जाणार आहे. आपली माहिती लिहून पाठविल्यास आमची संपादकीय टीम त्या लेखावर संस्कार करून लेख फायनल करणार आहे. पहिल्या २५ लेखकांचे मिळून एक पुस्तक असणार आहे. पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमादरम्यान २५ लेखकांचा सन्मान केला जाणार असून, पुरस्कार दिला जाणार आहे.
‘शिरूरचे झिरो टू हिरो’ हे पुस्तक अनेकांना मार्गदर्शन देणारे ठरणार असून, संग्राह्य राहणारे ठरणार आहे. संबंधित पुस्तकामध्ये प्रत्येकाला स्वतंत्र दहा पाने दिली जाणार आहेत. दहा पानांमध्ये सविस्तर माहिती, छायाचित्रे मांडता येणार आहे. ‘शिरूरचे झिरो टू हिरो’ या पहिल्या पुस्तकासाठी आजच आपले स्थान निश्चित करा.
‘शिरूरचे झिरो टू हिरो’ या पुस्तकाचे वैशिष्ट्ये…
१) शिरूर तालुक्यातील मान्यवरांच्या अनुभवांचे पहिले पुस्तक ठरणार.
२) पुस्तकातील माहिती www.shirurtaluka.com आणि डेलीहंटवर राहणार.
३) सोशल मीडियावरून माहिती व्हायरल होणार
४) प्रत्येक मान्यवराचा स्वतंत्र फोटो पुस्तकाच्या मुखपृष्टावर असणार
५) पुस्तकाची ISBN No. सह संग्राह्य राहणार
६) पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन
अधिक माहितीसाठी संपर्क:
तेजस फडकेः 97661 17755, 94230 20103
WhatsApp: 93712 69949
EMail: shirurtaluka@gmail.com
शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर. तालुक्यातील पिंपरखेड येथील बोंबे वस्तीवर जाणारा शेतरस्ता दीड वर्षांपासून वादग्रस्त ठरला…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील करडे हद्दीत असलेल्या एस. व्ही. एस. रेफकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे संस्कृती आणि कला यांचा संगम घडवणारा 'सार्वजनिक…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या पथकाने अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली.…
मुंबई (प्रतिनिधी) राज्यात दरवर्षी हजारो तरुण आत्महत्या करत आहेत. हि केवळ आकड्यांची बाब नाही, तर…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात तहसिल प्रशासनाची बेपर्वाई आणि निष्काळजीपणा वेळोवेळी उघड होत असुन तक्रारदाराने…