गुलकंद एक नैसर्गिक आणि गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ आहे, जो विशेषतः उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतो. याच्या सेवनाने अनेक आरोग्य फायदे मिळतात, जसे की पचनास मदत करणे, शरीरातील उष्णता कमी करणे आणि थकवा दूर करणे.
पचनास मदत: गुलकंद जेवणानंतर खाल्ल्यास पचन सुधारण्यास मदत होते आणि गॅस किंवा ऍसिडिटीची समस्या कमी होते.
शरीराला थंडावा: उन्हाळ्यात गुलकंद खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासांपासून आराम मिळतो.
थकवा दूर: गुलकंद थकवा आणि स्नायू दुखणे कमी करण्यास मदत करते, हिंदुस्तान टाइम्स नुसार ज्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते.
पाइल्ससाठी मदत: गुलकंद पाइल्सच्या समस्येसाठी देखील फायद्याचे आहे.
ॲंटीऑक्सिडंट: गुलकंदमध्ये ॲंटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील हानिकारक घटकांना दूर करतात आणि शरीराला डिटॉक्स करतात.
झोप सुधारते: रात्री झोपण्यापूर्वी १ चमचा गुलकंद कोमट दुधात मिसळून घेतल्यास झोप सुधारते.
नाकातून रक्त येणे: उन्हाळ्यात नाकातून रक्त येत असल्यास गुलकंद सेवन केल्यास आराम मिळतो.
जेवणानंतर १ चमचा गुलकंद खाऊ शकता.
झोपण्यापूर्वी १ चमचा कोमट दुधात मिसळून प्यावे.
उन्हाळ्यात रोज सकाळी किंवा दुपारच्या जेवणानंतर १ चमचा गुलकंद खाऊ शकता. गुलकंदचे वेगवेगळ्या प्रकारे सेवन केले जाते. पण गुलकंद मिश्रित दुध प्यायल्याने त्याचे आरोग्यास अनेक फायदे होतात.
गुलकंद हा असा खाद्यपदार्थ आहे जो आपण घरच्या घरी देखील बनवू शकतो. गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार होणा-या या गुलकंदाचे कितीतरी लोक आपल्या आहारात नियमितपणे सेवन करतात. गुलकंद स्वादिष्ट तर असतोच पण त्यासोबतच त्याचा सुगंध आपलं मन अगदी तृप्त आणि आनंदी करतो. उन्हाळ्यामध्ये याचे सेवन करणे फारच लाभदायक मानले जाते कारण ते फारच थंड असते आणि त्याच्या थंडपणाचा आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये बरेच औषधी गुणधर्म असतात जे अनेक रोग दूर करण्यास मदत करतात. याच गुलाबापासून बनणा-या गुलकंदामध्ये व्हिटॅमिन ‘सी’, ‘ई’ आणि ‘बी’ मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
डोळ्यांसाठी: सध्याच्या काळात आपण सतत संगणक, लॅपटॉप समोर बसून असल्याने डोळ्यांची निगा म्हणावी तशी आपल्याला राखता येत नाही. पण डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी गुलकंद फारच लाभदायक असतो. वैज्ञानिक अभ्यासामध्ये देखील हे सिद्ध झाले आहे की गुलकंद खाल्ल्याने आपल्या डोळ्यांची दृष्टी वाढण्यास मदत मिळते. तसेच गुलकंद आपल्याला डोळ्यांच्या इतर गंभीर आजारांपासून दूर ठेवण्यास मोलाची मदत करतो. तर दुधात व्हिटॅमिन अ असल्यामुळे त्याच्यासोबत गुलकंदाचे सेवन केल्याने अनेक प्रभावी फायदे आपल्या आरोग्यात दिसून येतात.
अल्सरवर प्रभावी: अल्सर झाला असल्यास त्यावर घरगुती उपचार करुन देखील पूर्णत: बरा करता येतो आणि यासाठी जास्त वेळ देखील जात नाही. अल्सरची समस्या ब-याचदा पोट व्यवस्थित साफ न झाल्याने उद्भवते. गुलकंदामध्ये व्हिटॅमिन बी चे जास्तीत जास्त स्त्रोत आढळून येतात. वैज्ञानिकदृष्ट्या व्हिटॅमिन बी हे अल्सरवर सर्वात जास्त प्रभावी औषध मानले जाते. तर अशाप्रकारे घरच्या घरी बनवलेल्या गुलकंदापासून तुम्ही तोंडात झालेल्या जखमा, अल्सर किंवा फोड बरे करु शकता.
स्मरणशक्ती वाढवतो: स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपले आई-वडिल आपल्याला लहानपणापासून बदाम खाण्याची सवय लावतात. बरेच लोक आपल्याला बदामासोबतच असे बरेच पदार्थ खाण्याचा सल्ला देतात जे की स्मरणशक्ती वाढवतात. पण दुधात गुलकंद मिसळून त्याचे सेवन केल्याने स्मरणशक्तीसाठी होणारे लाभ काही औरच असतात. गुलकंदात असणारे अॅंटिऑक्सिडंट गुणधर्म स्मरणशक्ती मजबूत बनवण्यात सकारात्मकतेने प्रभावी ठरतात. तसेच गुलकंद थंड असल्यामुळे ते तुम्हाला डोकं शांत ठेवण्यासही लाभदायक ठरतं.
वजन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी
लठ्ठपणामुळे त्रस्त असलेले लोक विविध खाद्यपदार्थांचा आपल्या आहारात समावेश करुन वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. वजन वाढल्याने कर्करोग आणि मधुमेह टाईप २ चा धोका देखील वाढू शकतो. या समस्येपासून दूर राहण्यासाठी तुम्हाला वजन नियंत्रित करणं आवश्यक असतं आणि या कामात गुलकंद उपयोगी पडतो. तसेच पोटाचे आरोग्य ठीक नसेल तर आपण अनेक आजारांना बळी पडू शकतो. योग्यरित्या पचनक्रिया न झाल्याने लोकांना बद्धकोष्ठते सारख्या त्रासांना सामोरे जावे लागते. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी मॅग्नेशियम पोषक तत्वांची आवश्यकता असते जे की गुलकंदमध्ये असतात. त्यामुळे या दोन्ही समस्यांवर नियंत्रण मिळवायचं असल्यास तुम्ही दररोज दुधात गुलकंद टाकून त्याचे सेवन करू शकता.
ताणतणावापासून दूर राहण्यासाठी: ताणतणावामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता कैक पटीने कमी होते आणि त्यामुळेच कितीतरी भयंकर आजारांच्या संक्रमणाच्या जाळ्यात आपण सहज ओढले जातो. गुलकंदामध्ये असलेले अॅंटीऑक्सिडंट हे गुणधर्म आपल्याला यापासून दूर राहण्यास मदत करतात. एका अभ्यासानुसार गुलकंदमिश्रित दुधाचे सेवन केल्याने आपण ताणतणावाच्या समस्येपासून दूर राहतो. त्यामुळ दररोज रात्री गुलकंद घातलेल्या दुधाचे सेवन केले पाहिजे. तर गुलकंद आणि दुध अशा दोन्हीही आरोग्यदायी गोष्टींच्या सेवनाने तुम्ही घरच्या घरी काही समस्यांचे निवारण आरामात करू शकता.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…
मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…
मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…
मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…
महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…