Suryankant-Palande
शिरूरः शिरूर तालुक्यामध्ये झालेला सर्वांगीण विकास आदरणीय देशाचे नेते शरद रावजी पवार साहेब यांच्यामुळे झालेला आहे. चासकमानचे पाणी घोडगंगा सहकारी साखर कारखाना, रांजणगाव एमआयडीसी तालुक्यातल्या शिक्षण संस्था तालुक्यातील शिक्षण संस्था साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण आणलेले आहेत. यापुढे बंद पडलेला सहकारी साखर कारखाना पण पुन्हा सुरू होणे गरजेचे आहे, त्या दृष्टीने संपूर्ण तालुक्यातील शेतकरी आज अडचणीत सापडला. शिरूर तालुका विकासाच्या दृष्टीने पुढे जाण्यासाठी आपण सर्वांनी योग्य नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहून आपले प्रश्न मार्गी लावून घेणे गरजेचे आहे. साहेबांच्या पाठीशी आपण सर्वजण ठामपणे राहावे असे आवाहन शिरूरचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.
शिरूरचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसह शरद पवार यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेऊन आपण त्यांच्यासमवेत असल्याची ठामपणे ग्वाही दिली आहे. सूर्यकांत ऊर्फ काकासाहेब पलांडे हे शरद पवार यांचे पहिल्यापासून कट्टर समर्थक आहेत. सूर्यकांत पलांडे यांच्या भूमिकेमुळे शिरूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
आंबेगाव-शिरूर या मतदारसंघातील 39 गावांमधून काकासाहेब पलांडे प्रतिनिधित्व करत असल्याने ते शरद पवार यांच्या सोबतीला गेले आहेत. राज्याच्या प्रगतीमध्ये शरद पवार यांचा वाटा मोठा आहेच, परंतु शिरूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पवार यांचे सर्वात जास्त योगदान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडणार्या घडामोडींमध्ये आबालवृद्धासह तरुणांचा शरद पवार यांच्यावर मोठा विश्वास आहे, अशी भावना काकासाहेब पलांडे यांनी व्यक्त केली.
शिरूर तालुक्यातील पूर्व पश्चिम भागातील सुमारे 100 प्रमुख कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या वेळी पवार यांच्याशी तालुक्यातील प्रश्नांसह शेतकर्यांशी निगडित ऊस व कांदा प्रश्नसंदर्भात चर्चा केली. घोडगंगा सहकारी कारखाना अडचणीत आला असून, त्यासंदर्भात मदत करण्याची मागणी केली. पवार यांनी याबाबत मदत करणार असल्याचे सांगत शेतकर्यांना उसाची एफआरपी देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कांदा खरेदी केंद्र सुरू करावे व शासनाने चांगल्या दराने कांदा खरेदी करून शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी कांदाप्रश्नी चर्चा झाल्याचे काकासाहेब पलांडे यांनी सांगितले.
दरम्यान, शिरूर तालुक्यातील दोन माजी आमदारांनी वेगवेगळी भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी आमदार पोपटराव गावडे हे अजित पवार गटात असून, ते सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या समवेत आहेत, तर माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ठाम पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे दोन्ही माजी आमदार आंबेगाव शिरूर मतदार संघातील 39 गावांमधून प्रतिनिधित्व करतात.
ध्येयवादी काका: सूर्यकांत गुलाबराव पलांडे…
जागरुक आणि चांगल काम करणारा लोकप्रतिनिधी असेल तर प्रश्न सुटतात; शरद पवार
घोडगंगात भ्रष्टाचार करुन अशोक पवारांनी व्यंकटेश उभारला: अॅड सुरेश पलांडे
शिरुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मोर्चा…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…