शिरुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मोर्चा…

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) बदलापुर (मुंबई) येथील शाळेतील साडेतीन वर्षाच्या दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध व्यक्त करत आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शिरुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज (दि २१) रोजी शिरुर येथील इंदिरा गांधी पुतळा ते तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. शिरुर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध मोर्चा काढण्यात आला. शिरुरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांना निवेदन देण्यात आले.

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार, मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे, राष्ट्रवादीच्या युवती तालुकाध्यक्षा संगीता शेवाळे, महीला शहराध्यक्ष डॉ स्मिता कवाद, युवती शहराध्यक्षा गीताराणी आढाव, माजी नगरसेविका रोहिणी बनकर, राणी कर्डीले, सविता बोरुडे, शशिकला काळे, प्रियंका धोत्रे, युवक राष्ट्रवादीचे  तालुकाध्यक्ष तुषार दसगुडे, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अमित शिर्के, ॲड रविंद्र खांडरे, बिजवंत शिंदे, तुषार दसगुडे, हाफिज बागवान, सागर नरवडे, अमोल चव्हाण, राहील शेख, सुरेश पाचर्णे, संजय चव्हाण, राजुद्दिन सय्यद आदी उपस्थित होते.

 

या मोर्चात महिलांनी ‘नको आम्हाला भिक्षा आरोपीला द्या शिक्षा’ गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, नाही पाहिजे आम्हाला तुमचे १५०० रुपये, आम्हाला आमची बहीण व मुलगी सुरक्षित पाहिजे अशा घोषणा देत सरकारचा निषेध व्यक्त केला.

 

यावेळी आमदार अशोक पवार यांनी बदलापुर येथील घटनेचा निषेध व्यक्त करीत राज्यात गृहमंत्री त्यांचा खात्याचा कुठलाही वचक राहिला नाही बदलापूर घटनेतील आरोपीला तात्काळ फाशी देण्यासाठी या घटनेचा गुन्हा फास्टट्रॅक चालवावा अशी मागणीही त्यांनी केली.

 

राज्यात महिला सुरक्षित नाहीत. त्यात शालेय विद्यार्थिनी व चिमुकल्याही सुरक्षित नाही.हि शरमेची गोष्ट असुन राज्य शासनाने याची दखल घेऊन कडक कारवाई करुन आरोपीला तात्काळ फाशी कशी मिळेल याकडे लक्ष द्यावे. राज्याचे गृहमंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या युवती तालुकाध्यक्षा संगीता शेवाळे यांनी केली.

घोड धरणातील वाळू चोरीबाबत महसुल विभागाच वरातीमागुन घोड शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल

मंगलदास बांदल यांना ईडीने केली अटक; कोट्यवधींचं घबाड

शिरुरमध्ये महिलांचे अनोखे रक्षाबंधन राखी सामाजिक प्रश्नांची अन ओवाळणी महिला सुरक्षेची