मुख्य बातम्या

शिरूर! राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारताच तृप्ती सरोदे यांनी हाती घेतले धनुष्यबाण…

शिरूर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण-न्हावरे गटात निवडणुकीच्या ऐन तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा हादरा बसला आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणून इच्छुक असलेल्या आणि तळागाळात प्रभावीपणे काम करणाऱ्या तृप्ती सरोदे यांना पक्षाने शेवटच्या क्षणी उमेदवारी नाकारत अनपेक्षित धक्का दिला. या निर्णयाने संतप्त झालेल्या सरोदे यांनी क्षणाचाही विलंब न करता राष्ट्रवादीशी काडीमोड घेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अनेक महिन्यांची तयारी, पण अखेर डावललेच…
तृप्ती सरोदे या गेल्या अनेक महिन्यांपासून शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात सक्रिय होत्या. गटातील प्रत्येक गावातील घराघरात संपर्क, स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका, कार्यकर्त्यांचे संघटन, तसेच निवडणुकीसाठी पूर्ण तयारी त्यांनी केली होती. राष्ट्रवादीच्या अंतर्गत बैठका, दौरे आणि शक्तिप्रदर्शनातही त्यांची उपस्थिती ठळक होती. त्यामुळे उमेदवारी त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र होते. मात्र, ऐनवेळी पक्षाने त्यांचे नाव बाजूला सारत वेगळाच उमेदवार पुढे केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

गटबाजी केल्याचा सरोदे यांचा आरोप…
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी, वरिष्ठ नेत्यांचा दबाव आणि पक्षातील नेत्यांच्या कुरघोड्या यामुळे तृप्ती सरोदे यांना डावलण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. स्थानिक, निष्ठावंत आणि मेहनती कार्यकर्त्यांऐवजी पैसेवाल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप सरोदे समर्थकांनी केला आहे. या निर्णयामुळे मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

“प्रामाणिक कार्यकर्त्यांची किंमत नाही” सरोदे यांची रोखठोक भूमिका…
राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर तृप्ती सरोदे यांनी पक्षाच्या धोरणांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली. “जिथे प्रामाणिक कामाला आणि निष्ठेला किंमत नाही” अशा पक्षात राहण्यापेक्षा “जनतेसाठी लढणाऱ्या पक्षासोबत उभे राहणे योग्य राहील” अशी थेट आणि धारदार प्रतिक्रिया त्यांनी दिली.

शिवसेनेत जल्लोषात प्रवेश, हाती घेतला धनुष्यबाण…
या सगळ्या घडामोडीनंतर अवघ्या काही तासांतच तृप्ती सरोदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. धनुष्यबाण हाती घेत त्यांनी नव्या राजकीय लढ्याची घोषणा केली.“शिवसेना ही संघर्षातून उभी राहिलेली चळवळ आहे. सामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष म्हणूनच मी शिवसेनेत आले आहे,” असे सूचक विधान सरोदे यांनी यावेळी केले.

राष्ट्रवादीसमोरील अडचणी वाढणार…?
या घडामोडीमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत असंतोष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे पक्ष संघटना मजबूत असल्याचे दावे केले जात असताना, दुसरीकडे ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने होणारी बंडखोरी पक्षासाठी गंभीर इशारा मानली जात आहे. आगामी निवडणुकीत पक्षाला अशा निर्णयांचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मतदारसंघातील समीकरणे बदलणार…
तृप्ती सरोदे यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे संबंधित मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत. सरोदे यांचा जनसंपर्क, स्थानिक पकड आणि नाराज राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा संभाव्य ओढा शिवसेनेकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ प्रतिष्ठेची नव्हे, तर दोन्ही पक्षांसाठी ‘करो वा मरो’ची ठरणार असल्याचे बोलले जात आहे. आता “अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून निघालेली ही नाराजी किती मोठा फटका देणार…?” आणि “शिवसेनेचा धनुष्यबाण किती निर्णायक ठरणार..?” याकडे संपूर्ण शिरुर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

शिरुर ग्रामीण-न्हावरे गटात उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ कायम; राष्ट्रवादीच्या तृप्ती सरोदे मात्र ‘प्रचारात’ आघाडीवर

शिरुर ग्रामीण–न्हावरे जिल्हा परिषद गटात ‘शांतता’; तृप्ती सरोदे मैदानात तर बाकी उमेदवार…

Video: शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात तृप्ती सरोदे यांना वाढता प्रतिसाद…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

करडे-कारेगाव रस्त्यालगत विद्युत खांबांवर प्लॉटिंग, जमीन-विक्रीच्या जाहिरातींचा सुळसुळाट; महावितरणची यंत्रणा नेमकी करतेय काय…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : करडे-कारेगाव रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेले महावितरणचे विद्युत खांब सध्या वीजपुरवठ्यापेक्षा…

2 तास ago

शिरूर हादरलं! लॉजमध्ये युवतीवर 7 जणांचा आळीपाळीने अत्याचार; पाहा नावे…

शिरूर : चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून एका परप्रांतीय युवतीला (वय २२) लॉजमध्ये डांबून तिच्यावर…

4 तास ago

फडणवीसांचा ‘जेन-झी संवाद’ सुपरफ्लॉप; सपकाळांचा घणाघात, ‘कॉपी-पेस्टही करता येत नाही!’

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील ‘जेन-झी संवाद’ कार्यक्रमावर जोरदार…

17 तास ago

नाशिकमध्ये काँग्रेसचे १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर; राहुल गांधी करणार विशेष मार्गदर्शन

मुंबई: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

17 तास ago

शरीराच्या सर्व नसा उघडण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

कापूर आणि लिंबू किती उपयुक्त आहेत. दिवसातून एकदा तरी हा सोपा उपाय करून पहा, तुम्हाला…

1 दिवस ago

दररोज भरभर चालण्याचे असे होतात फायदे

सहज कुठेही आणि कधीही करता येण्याजोगा चल पद्धतीचा चांगला व्यायाम कोणता, असं जर आरोग्यतज्ज्ञांना विचारलं…

1 दिवस ago