शिरूर तालुका

रांजणगाव MIDCचा विकास की प्रदूषणाची शिक्षा? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करते काय…

शिरूर: रांजणगाव एमआयडीसीमुळे शिरूर तालुक्यात गुंतवणूक आणि रोजगाराचे दार उघडले, मात्र त्याची किंमत आता शेतकरी आणि सामान्य नागरिकांना जीवावर येण्यासारखी मोजावी लागत आहे. रासायनिक प्रदूषणामुळे ओढ्यांचे पाणी दूषित होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून या पाण्याचा थेट फटका गावातील पिकांना आणि आरोग्याला बसत आहे.

पिकांचे नुकसान, जमिनीची सुपीकता कमी होणे, जनावरांवर परिणाम अशा अनेक अंगांनी या प्रदूषणाने गावकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. शिरूर तालुक्यातील काही युवकांना रोजगार मिळाला आहे, पण प्रदूषण संपूर्ण तालुक्याला मिळत आहे, असा रोखठोक सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. कंपन्या उघड उघड रासायनिक कचरा बाहेर टाकत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमके कोणाच्या बाजूने उभे आहे? असा थेट राजकीय प्रश्न आता चर्चेत आहे. नियम तोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई न करणे आणि अधिकारी मौन धारण करणे याबद्दल स्थानिकांमध्ये संताप आहे.

प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर आणि कारवाई टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन उभे केले जाईल आणि जबाबदारी प्रशासनाची असेल. स्थानिक राजकीय पातळीवरही हा प्रश्न भडकल्याची चिन्हे सुरू झाली आहेत. काही नेत्यांनी प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकीत घेऊन जाण्याच्या हालचाली सुरू केल्याचे बोलले जाते.

अनेक कंपन्या थेट रसायने बाहेर फेकत असताना, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमके काय करत आहे, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच कारवाई करावी, अशी मागणीही पुढे आली आहे. कंपन्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई आणि निरीक्षण यंत्रणा मजबूत करण्याची मागणी होऊनही ठोस कृती होत नसल्याने आंदोलनाची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. कंपन्यांवर कारवाई केली नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Video; रांजणगाव MIDC तील MEPL च्या प्रश्नावर खासदार डॉ अमोल कोल्हे आक्रमक…

MEPL कंपनीच्या पाण्यामुळे शेती नापीक झाल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याचा कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा

रांजणगाव येथील जल प्रदुषण करणाऱ्या MEPL कंपनीवर बंदी आणा खासदार डॉ अमोल कोल्हे यांची लोकसभेत मागणी

रांजणगाव MIDC तील MEPL कंपनीच्या दूषित पाण्याबाबत ग्रामस्थांची उद्योगमंत्र्याकडे धाव

MEPL कंपनीबाबत येत्या अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडावा शेखर पाचुंदकर यांची दिलीप वळसेंकडे मागणी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

9 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

10 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

11 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

1 दिवस ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 दिवस ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago