क्राईम

शिरूरमध्ये तब्बल २० कोटींच्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; ‘आतील माणूस’ निघाला पोलिसच…

शिरूर (अरुणकुमार मोटे): अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करत असल्याचे वरवर चित्र रंगवणाऱ्या यंत्रणांच्या आतच गुन्हेगारीची मुळे खोलवर रुजल्याचे धक्कादायक वास्तव शिरूर पोलिस व गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणने उघड केले आहे. आतापर्यंत अंदाजे तब्बल १० किलो वजनाचे, सुमारे २० कोटी रुपये किमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले असून, या प्रकरणात नगर स्थानिक गुन्हे शाखेतील (LCB) पोलिस हवालदारच थेट ड्रग्स रॅकेटमध्ये सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही बाब केवळ कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी नसून, संपूर्ण पोलिस यंत्रणेच्या विश्वासार्हतेला हादरा देणारी ठरली आहे.

ड्रग्स तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी शाम सुंदर गुजर (रा. नेप्ती, ता. नगर, जि. अहिल्यानगर) हा नगर एलसीबीमध्ये पोलिस हवालदार म्हणून कार्यरत असल्याचे समोर येताच खळबळ उडाली. समाजात कायद्याचे रक्षण करणारा म्हणून ओळख असलेला हा अधिकारी प्रत्यक्षात ड्रग्स माफियांचा ‘आतील माणूस’ असल्याचे तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे, गुन्हेगारांवर छापे टाकणाऱ्या यंत्रणेत बसूनच तो अमली पदार्थांच्या तस्करीला संरक्षण, माहिती व सोयी पुरवत होता, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. अखेर पुरावे ठोस झाल्यानंतर त्याला अटक करून गजाआड करण्यात आले आहे.

या प्रकरणात ड्रग्सचा माल पुरवणारा माऊली शिंदे (रा. कोहकडी, ता. पारनेर) यालाही पोलिसांनी अटक केली असून, आतापर्यंत आरोपींची संख्या तीन झाली आहे. गुजर या साखळीतील महत्त्वाचा वितरक असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे याच्या माध्यमातून ड्रग्स ग्रामीण भागात तसेच तरुणाईपर्यंत पोहोचवले जात असल्याचा संशय आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, हे ड्रग्स केवळ जिल्ह्यापुरते मर्यादित नसून आंतरजिल्हा व आंतरराज्य नेटवर्कशी जोडलेले असण्याची दाट शक्यता आहे. पोलिस हवालदाराचा सहभाग असल्याने या रॅकेटला दीर्घकाळ अभय मिळाले का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या कारवाईनंतर जनतेत संतापाची लाट उसळली असून, “जर कायद्याचे रक्षकच भक्षक बनले असतील, तर सामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कुणाकडून करावी?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. अमली पदार्थांचे वाढते जाळे तरुण पिढी उद्ध्वस्त करत असताना, त्याला आळा घालण्याची जबाबदारी असलेलेच अधिकारी जर त्यात सहभागी असतील, तर ही बाब अत्यंत धोकादायक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत इतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू केली असून, आणखी नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणामुळे नगर पोलिस खात्यातील अंतर्गत शिस्त, नियंत्रण व पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ड्रग्सविरोधी लढा केवळ घोषणांपुरता न राहता, स्वतःच्या खात्यातील काळी मेंढरे शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, अन्यथा ‘ड्रग्समुक्त समाज’ हा केवळ कागदी नारा ठरेल, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

शिरूरमध्ये एमडी ड्रग्जविरोधात धडक कारवाई; कोट्यावधींच्या मुद्देमालासाह आरोपीला अटक…

मोठी बातमी! शिरुर तालुक्यात फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती; १७४ किलो ड्रग्ज जप्त

शिरूरमध्ये मध्यरात्री बिबट्याचा थरार! नागरिक सतर्क, वन विभाग अलर्ट मोडवर

मोठा कट उघड! शिरूर भूमी अभिलेख कार्यालयातील ३ कर्मचाऱ्यांसह दहा जणांवर गंभीर गुन्हे दाखल…

शिरूर! पंचनाम्याच्या बदल्यात ‘दर ठरवला’; लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

7 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

7 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

9 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

1 दिवस ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 दिवस ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago