trupti-sarode

शिरुर ग्रामीण–न्हावरे जिल्हा परिषद गटात ‘शांतता’; तृप्ती सरोदे मैदानात तर बाकी उमेदवार…

मुख्य बातम्या राजकीय

शिरुर (तेजस फडके) : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला असताना शिरुर ग्रामीण–न्हावरे जिल्हा परिषद गटात मात्र चित्र वेगळेच दिसत आहे. राजकीय रणधुमाळी सुरू असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या तृप्ती अजय सरोदे यांच्या व्यतिरिक्त कोणताही इच्छुक उमेदवार उघडपणे मैदानात उतरलेला दिसत नाही. त्यामुळे या गटात “इतका सन्नाटा का…?” असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

मात्र या शांततेआड तृप्ती सरोदे यांची जोरदार तयारी सुरु आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून त्यांनी शिरुर ग्रामीण–न्हावरे गटातील प्रत्येक गाव, वाडी-वस्ती, घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला आहे. इतर पक्ष अजुनही गणिते मांडण्यात गुंतले असताना सरोदे यांनी मात्र प्रचाराची पहिली फळी उघडल्याचे चित्र आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

२०१७ चा इतिहास, २०२६ चे नवे समीकरण…
सन २०१७ मध्ये या गटात भाजपकडून राहुल पाचर्णे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जगदाळे पाटील यांच्यात थेट लढत झाली होती. या चुरशीच्या निवडणुकीत राजेंद्र जगदाळे पाटील यांनी तब्बल २,८०५ मतांनी विजय मिळवला होता. सध्याच्या निवडणुकीत या गटात इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

पुन्हा पाचर्णे विरुद्ध जगदाळे की पाचर्णे विरुद्ध सरोदे…?
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून तृप्ती सरोदे, माजी जि.प. सदस्य राजेंद्र जगदाळे यांच्या पत्नी कविता जगदाळे, भाजपकडून माजी आमदार लोकनेते स्व. बाबुराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचर्णे,जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक दौलत शितोळे यांच्या पत्नी पुजा शितोळे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून अद्याप एकही इच्छुक उमेदवार पुढे न आल्याने संभ्रमाचे वातावरण कायम आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद ला पुन्हा पाचर्णे विरुद्ध जगदाळे अशी लढत होऊन सन २०१७ ची पुनरावृत्ती होणार की पाचर्णे विरुद्ध सरोदे अशी लढत होणार याची मतदारांना उत्सुकता लागली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

भाजपा–राष्ट्रवादी (अजित पवार) वर्चस्वासाठी सज्ज…
या गटावर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी आपल्या पारंपरिक मतदारसंघातील पकड मजबूत ठेवण्यासाठी अनुभवी नेते आणि माजी पदाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे भाजपने केंद्र–राज्य सरकारच्या योजना, विकासकामे आणि संघटनबांधणी यांचा जोर वाढवत मैदान तापवण्यास सुरुवात केली आहे.

तृप्ती सरोदे प्रचारात स्पष्ट आघाडीवर…
राष्ट्रवादी कडुन इच्छुक असलेल्या तृप्ती सरोदे यांनी गावोगावी बैठका, गुप्त राजकीय हालचाली, कार्यकर्त्यांची मोट बांधणी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार सुरु केल्याने तृप्ती सरोदे सध्या इतर सर्व इच्छुकांपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महायुती, महाविकास आघाडी की एखादा ताकदवान अपक्ष याची उत्सुकता तालुकाभर वाढली आहे.

स्थानिक मुद्द्यांवरच होणार निकाल
या निवडणुकीत चासकमान धरणाच्या टेल-टू-हेड पाण्याचा प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था, शेतीसाठी वीज, एमआयडीसीतील रोजगार, आरोग्य सुविधा हे मुद्दे कळीचे ठरणार असून, मतदार याच प्रश्नांवर उमेदवारांची पारख करणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

पंचायत समिती गणातही हालचाली
न्हावरे पंचायत समिती गण (सर्वसाधारण पुरुष) मध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून दिपक कोकडे, सागर खंडागळे (न्हावरे), राजेंद्र बबन जगदाळे (पाटील) (करडे) हे इच्छुक आहेत. तर शिरूर ग्रामीण पंचायत समिती गण (ओबीसी महिला) मध्ये भाजपकडून स्वाती विठ्ठल घावटे इच्छुक असून राष्ट्रवादीकडूनही अनेक महिला कार्यकर्त्या तयारीत आहेत; मात्र त्यांची नावे अद्याप गुलदस्त्यातच आहेत.

Video: शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात तृप्ती सरोदे यांना वाढता प्रतिसाद…

जिल्हा परिषद निवडणूक! टाकळी हाजी जिल्हा परिषद गटाचा ऐतिहासिक, सामाजिक व राजकीय आढावा

ZP निवडणुक; कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, शास्ताबाद गावातील ग्रामस्थ पाणीप्रश्नावर आक्रमक…? 

वाघोलीला मतदानासाठी आलात तर रडस्तोर मारून पोलिसांच्या हवाली केले जाईल…

१२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजल