मुख्य बातम्या

शिरुर; खुनाचा प्रयत्न करुन पाच वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

न्हावरे (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतील उरळगाव येथे सन २०१९ साली शेतातील बांधावरील रस्त्यावरुन ट्रॅक्टर घेवुन गेल्याबाबत जाब विचारल्याने विनोद चंद्रकांत होलगुंडे आणि त्याच्या इतर ६ साथीदारांनी चिडुन जावुन सागर रसिक होलगुंडे याला जिवे ठार मारण्याच्या उ‌द्देशाने डोक्यात कुऱ्हाडीने मारहाण केली. तसेच सागरच्या नातेवाईकांनाही मारहाण केली होती. त्यानंतर विनोद होलगुंडे हा पाच वर्षे फरार होता. पाच वर्षांनंतर शिरुर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अंमलदार रघुनाथ हाळनोर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, शिरुर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ३३६/२०१९ मधील पोलिस शोध घेत असलेला आरोपी विनोद चंद्रकांत होलगुंडे (रा.उरळगाव ता.शिरुर, जि.पुणे) हा उरळगाव येथील होलगुंडे वस्ती येथे येणार आहे. रघुनाथ हाळनोर यांनी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना याबाबत माहीती दिल्याने या आरोपीस ताब्यात घेण्याबाबत संदेश केंजळे यांनी शिरुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला आदेश दिले होते.

 

त्यानंतर मिळालेल्या माहितीप्रमाणे शिरुर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक हणमंतराव गिरी आणि त्यांच्या पथकामधील पोलीस अंमलदार रघुनाथ हाळनोर, विजय शिंदे, निखिल रावडे, निरज पिसाळ यांनी तातडीने उरळगाव (ता.शिरुर, जि. पुणे) येथील होलगुंडे वस्ती येथे जावुन आरोपीस सापळा लावुन शिताफिने पकडुन ताब्यात घेतले आहे.

 

याबाबत सन २०१९ साली शिरुर पोलीस स्टेशन येथे सागर रसिक होलगुंडे (रा.होलगुंडे वस्ती, उरळगाव, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी तक्रार दिलेली आहे. यातील फिर्यादी व त्यांचे नातेवाईक यांनी शेतातील बांधावरील रस्त्यावरुन ट्रॅक्टर घेवुन गेल्याबाबत आरोपी विनोद चंद्रकांत होलगुंडे (रा.उरळगाव, ता.शिरुर, जि. पुणे) आणि त्याचे इतर ६ साथीदार यांना विचारणा केली असता आरोपींनी चिडुन जावुन जिवे ठार मारण्याच्या उ‌द्देशाने फिर्यादीच्या डोक्यात कुऱ्हाडीने मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या इतर नातेवाईकांनाही जबर मारहाण केली होती. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी विनोद चंद्रकांत होलगुंडे हा सन २०१९ पासुन अद्यापपर्यंत फरार होता.

 

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिरुरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हणमंतराव गिरी, पोलिस हवालदार नाथसाहेब जगताप, परसराम सांगळे, पोलीस अमंलदार विजय शिंदे, निरज पिसाळ, निखील रावडे, रघुनाथ हळनोर, नितेश थोरात, सचिन भोई यांच्या पथकाने केली आहे.

 

शिरुर पोलिसांची खऱ्या अर्थाने ‘सिंघमगिरी’ सुरु…

शिरुर पोलिस स्टेशनचा कारभार हातात घेतल्यापासुन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी शिरुर पोलिस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी कठोर पाऊले उचलली असुन ‘सद रक्षणाय खल निग्रहणाय’ या वाक्याप्रमाणे संदेश केंजळे यांच्या कारवाईचा गुन्हेगारांनी चांगलाच धसका घेतला आहे. पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुरच्या गुन्हे शोध पथकानेही सध्या जुन्या गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढत कारवाईचा बडगा उगारला असल्याने गुन्हेगारांची पाचावर धारण बसली असल्याची शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

शिरुर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकपदी संदेश केंजळे यांची नियुक्ती; ज्योतिराम गुंजवटे यांची मुख्यालयात बदली

शिरुर शहरात पोलिसांची दबंगगिरी; पाच पिस्तुलासह चार काडतुसे जप्त करत दोघांना ठोकल्या बेड्या

शिरूचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांची पहिले जनसुनवाई मगच कारवाई

शिरुर पोलिसांची दहा इलेव्हन कॅफेवर धडक कारवाई, मुला-मुलींचे अश्लील वर्तन; कॅफे चालकावर गुन्हा दाखल

कौतुकास्पद; रांजणगाव पोलीसांनी खुन करुन फरार झालेल्या आरोपीच्या २४ तासात आवळल्या मुसक्या

रामलिंग येथे हाय व्होल्टेजच्या तारांखाली सेंट्रींगचे काम करत असताना तारेचा शॉक बसून कामगाराचा मृत्यू

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

5 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago