शिरूर तालुका

शिरुरच्या बेट भागात हॉटेल मॅनेजरवर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला; गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) पिंपरखेड (ता.शिरुर) येथील ‘हॉटेल विसावा’ च्या मॅनेजरला एक लाख रुपये दे अशी मागणी करत ते देण्यास नकार दिल्याने मॅनेजरवर धारदार कोयत्याने डोक्यात व हातावर जीवघेणा हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केल्याप्रकरणी एकावर शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हॉटेल मॅनेजर हरेश ठकाजी चोरे (वय४५) रा. जांबुत ता.शिरुर, जि.पुणे यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असुन प्रशांत सारंगकर शिरसाठ (रा. ढोमेमळा, पिंपरखेड ता. शिरुर जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि २९सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता पिंपरखेड (ता.शिरुर) गावच्या हद्दीतील विसावा हॉटेल या ठिकाणी प्रशांत सारंगकर शिरसाठ याने हॉटेल मॅनेजरकडे एक लाख रुपये मागितले. ते त्याला दिले नाही म्हणुन त्याने हॉटेल मॅनेजर हरेश चोरे याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील कोयत्याने डाव्या हाताच्या कोपऱ्यावर आणि डोक्यात वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

 

याबाबत हॉटेल मॅनेजर हरेश ठकाजी चोरे याने शिरुर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केल्याने प्रशांत सारंगकर शिरसाठ याच्यावर गुन्हा दाखल केला असुन या घटनेचा पुढील अधिक तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार हे करत आहेत.

शिरुर; खुनाचा प्रयत्न करुन पाच वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

शिरुर शहरात पोलिसांची दबंगगिरी; पाच पिस्तुलासह चार काडतुसे जप्त करत दोघांना ठोकल्या बेड्या

शिरुर तालुक्यात युवकाला कोयत्याने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी

शिरुर तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवत परप्रांतीय युवकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल

कौतुकास्पद; रांजणगाव पोलीसांनी खुन करुन फरार झालेल्या आरोपीच्या २४ तासात आवळल्या मुसक्या

MEPL कंपनीच्या पाण्यामुळे शेती नापीक झाल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याचा कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा

रामलिंग येथे हाय व्होल्टेजच्या तारांखाली सेंट्रींगचे काम करत असताना तारेचा शॉक बसून कामगाराचा मृत्यू

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

6 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago