crime

रामलिंग येथे हाय व्होल्टेजच्या तारांखाली सेंट्रींगचे काम करत असताना तारेचा शॉक बसून कामगाराचा मृत्यू

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे) रामलिंग गावच्या हद्दीतील गट नं. २५ ग्रीन पार्क हॉटेलच्या पाठीमागे लॅन्ड डेव्हलपर्सच्या ऑफिसचे बांधकाम होत असताना कोणतीही काळजी न घेता तसेच महावितरणची परवानगी न घेता हाय होल्टेजच्या तारेच्या खाली सेंट्रीगचे काम सुरु असताना शॉक लागून राधेश्याम महेशप्रसाद चौरासिया (वय ४६ वर्ष) या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार (दि ३०) सप्टेबर रोजी राधेश्याम महेशप्रसाद चौरासिया हे सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रामलिंग रोडवरील साईटवर सेंट्रींगचे कामावर गेले होते. दुपारी ४:१५ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा सुधीर राधेश्याम चौरासिया (वय २४) हा शिरुर येथे जेनेरिक मेडीकल येथे असताना त्याला ओळखीचे अनिल घावटे यांचा फोन आला व त्यावेळी त्यांनी सांगितले की तुझे वडील राधेश्याम महेशप्रसाद चौरासिया (वय ४६) वर्षे यांना बांधकामाच्या साईटवर असताना इलेक्ट्रिक लाईटचा शॉक लागला आहे.

 

तेव्हा लगेच रामलिंग येथे वडीलांचे काम चालु असलेल्या ठिकाणी मुलगा सुधीर हा गेला असता. त्याला त्याचे वडील तेथे बेशुध्द अवस्थेत पडलेले दिसले. त्यांनंतर तेथे जमलेल्या लोकांच्या मदतीने मुलाने वडिलांना उपचारकामी शिरुर ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी राधेश्याम चौरसिया यांना तपासुन ते उपचारापुर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. याबाबत सुधीर राधेश्याम चौरसिया यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत गिरी हे करत आहे.

 

बांधकाम व्यावसायिकाचा आतातायीपणा नडला….?

सदर डेव्हलपर्सने पोल व तारा शिफ्टिंग साठी महावितरणकडे अर्ज केला होता. परंतु त्याबाबतचे काम प्रलंबित होते .त्यामुळे परवानगी न घेता पोल व तारा शिप्ट न करता डेव्हलपर्सने काम सुरु केल्याचे शिरुर महावितरचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव यांनी सांगितले आहे. हाय होल्टेजच्या ताराखाली असे धोकादायकरीत्या काम केल्यामुळे हा अनर्थ घडला आहे. त्यामुळे आता महावितरण विभाग आणि शिरुर पोलीस स्टेशन यावर काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

MEPL कंपनीच्या पाण्यामुळे शेती नापीक झाल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याचा कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा

विद्यार्थ्यांनो शालेय जीवनातील संस्कारांचा यशस्वी होण्यासाठी उपयोग करा; प्रकाश कुतवळ

शिरुर तालुक्यात युवकाला कोयत्याने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी

शिरुरच्या विद्याधाम शाळेतील चिमुकल्यांनी अनुभवल्या वैज्ञानिक गमती जमती, क्षेत्र भेटीमधुन प्रयोगशाळेला भेट

प्रगतशील शेतकरी सुजाता थोरात यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान!