शिरुर पोलिसांची ‘दहा इलेव्हन कॅफे’ वर धडक कारवाई, मुला-मुलींचे अश्लील वर्तन; कॅफे चालकावर गुन्हा दाखल

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील शाळेतील अल्पवयीन मुले तसेच कॉलेज मधील मुलामुलींना अश्लील वर्तन करण्याची मुभा देऊन त्यासाठी अवैध पार्टीशन टाकलेल्या शिरुर शहरातील ‘दहा ईलेव्हन कॅफे’ वर शिरुर पोलिसांनी साध्या वेशात ग्राहक म्हणुन जाऊन छापा टाकुन कॅफे चालकावर गुन्हा दाखल केला आहे. शिरुर शहरातील सर्व अवैध कॅफे बंद करण्याची मागणी शिरूर शहरातील नागरिकांकडुन होत आहे.

 

शिरुर शहरातील अशा कॅफेमधुन इमारत मालकांना मोठ्या प्रमाणात भाडे मिळत असल्यामुळे ते अशा अनधिकृत कॅफेना आपले गाळे भाड्याने देत आहेत. त्यांना याबाबत माहिती असुनही भाड्यापोटी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत अशा गाळेमालकांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. त्यामुळे गाळा भाड्याने देताना लोक विचार करतील.

 

याबाबत पोलिसांनी ‘दहा ईलेव्हन कॅफे’ चे चालक सौरभ शिवाजी पवार (वय २२) रा. सिद्धार्थनगर, शिरुर ता. शिरुर, जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिरुर पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे, शिरुर शहरातील वेगवेगळ्या कॅफे चालकांनी त्यांच्या कॅफे हॉटेल मध्ये अवैध पार्टीशन केल्याने शाळेतील व कॉलेज मधील मुले मुली हे असभ्य व अश्लील वर्तन करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांना मिळाली.

 

त्यांनतर पोलीस शिपाई निलेश थोरात, पोलीस हवालदार अरुण उबाळे, निलेश शिंदे, रघुनाथ हाळनोर, महिला पोलीस शिपाई रेश्मा पळसकर यांनी साध्या वेशात शहरातील १० ईलेव्हन कॅफे येथे जाऊन नाष्टा ऑर्डर देऊन आयमध्ये बसले असता त्यांना काही शालेय मुले मुली येऊन कॅफे चालकाने पार्टीशीयन केलेल्या रूममध्ये बसून असभ्य व अश्लील कृत्य करताना दिसून आले. तर अजुनही काही शाळकरी मुले मुली देखील तेथे येत असल्याचे दिसून आले.

 

याबाबत शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई निलेश दत्तात्रय थोरात (वय ३४) रा.शिरुर, ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी १० ईलेव्हन कॅफेचे चालक सौरभ शिवाजी पवार (वय २२ वर्षे रा. सिद्धार्थनगर शिरुर ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अरुण उबाळे हे करत आहेत.

शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

शिरुर येथुन अचानक आई व मुलगा बेपत्ता, पोलिस स्टेशनमध्ये हरविल्याची तक्रार दाखल; पतीचे गंभीर आरोप

शिरुर येथील सेंट जोसेफ शाळेत डिजेच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत डान्स करणे शिक्षकांना भोवले; तब्बल १७ जणांवर गुन्हा दाखल

शिरुर; साळवे यांच्या तक्रारीत कुठलेही तथ्य नाही, शाळेच्या बदनामीच्या कटाविरुद्ध न्यायालयात जाणार; नॅन्सी पायस