रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती-कारेगाव जिल्हा परिषद गटात सध्या थंडीच्या दिवसात राजकीय मात्र गरम झाले असुन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत सोनेसांगवी गावच्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या विद्यमान संचालक गंगुबाई शेळके तसेच त्यांचे पती माजी उपसरपंच हनुमंत शेळके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
शिरुर खरेदीविक्री संघांचे माजी संचालक तसेच सोनेसांगवी गावचे माजी सरपंच दत्तात्रय कदम यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण हनुमंत शेळके तसेच त्यांच्या पत्नी गंगुबाई शेळके हे दोघेही दत्तात्रय कदम तसेच मानसिंग पाचुंदकर यांचे कट्टर समर्थक होते. तसेच आठ दिवसांपुर्वी मानसिंग पाचुंदकर यांच्या सोबत हे दांपत्य राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात उपस्थित होते.
परंतु गावातील काही अंतर्गत राजकारणामुळे त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला रामराम करत रांजणगाव गणपती येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तसेच शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी रांजणगाव गणपती-कारेगाव जिल्हा परिषद गटातुन भाजपाकडुन इच्छुक असलेल्या उमेदवार स्वाती पाचुंदकर यांना जाहीर पाठिंबा दिला. तसेच शेवटपर्यंत शिवसेनेत राहणार असल्याचेही सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष देविदास दरेकर, पुणे जिल्हा युवासेनेचे अध्यक्ष बापुसाहेब शिंदे, आंबेगाव-शिरुरचे तालुकाध्यक्ष मल्हारी काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सोनेसांगवी गावचे चार विद्यमान ग्रामपंचायत सदस्य लवकरच शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश करणार असल्याचे यावेळी मल्हारी काळे यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता असल्याची सगळीकडे दबक्या आवाजात सध्या चर्चा सुरु आहे.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…