शिंदोडी (तेजस फडके) करडे ते कारेगाव हा मुख्य रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल ३०० पेक्षा अधिक खड्ड्यांनी हा मार्ग विद्रूप झाला असून नागरिक आणि वाहनचालकांचे हाल होत आहेत.
दररोज या रस्त्याने रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अनेक कामगार प्रवास करतात. मात्र प्रत्येक दहा-पंधरा फूटांवर खोल खड्डे निर्माण झाल्याने या रस्त्यावर प्रवास करणे धोकादायक झाले आहे. यंदा मे महिन्यात पाऊस सुरु झाला आणि ऑक्टोबर महिन्यात बंद झाला. गेले सहा महिने या रस्त्यावरुन जाणाऱ्या प्रत्येक वाहनाचं चाक एखाद्या खड्ड्यात आदळल्याशिवाय पुढे जातच नाही.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत तक्रारी केल्या, मात्र आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. करडे ते कारेगाव रस्त्याच्या सहा किलोमीटर अंतरासाठी करडे ते बाभुळसर शिव या ४ किमी अंतरावर तब्बल २४० खड्डे पडले आहेत. तर बाभुळसर शिव ते कारेगाव या २ किमी अंतरावर तब्बल ६० खड्डे पडले आहेत. या दोन्ही रस्त्याचे काम दोन वेगवेगळ्या ठेकेदारांनी केले आहे.
या रस्त्याच्या निकृष्टपणाबाबत बोलताना शेतकरी संघटनेचे बापुसाहेब शिवले म्हणाले, करडे-कारेगाव या ६ किमी रस्त्याचे काम सुरवातीपासुनच खराब झाले आहे. रस्त्यात खड्डे आहेत कि खड्यात रस्ता आहे हेच कळत नाही. प्रशासन मात्र परस्परांवर जबाबदारी ढकलण्यातच व्यस्त आहे असे त्यांनी सांगितले.
याबाबत शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बाबासाहेब गाडेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही या रस्त्याची पाहणी केली असुन लवकरच या रस्त्याचे काम सुरु करण्यात येणार आहे.
Video; ठेकेदाराचा अजब कारभार; भर पाऊसात करडे-कारेगाव रस्त्याची डागडुजी…?
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…