मुख्य बातम्या

…तर मी उमेदवारी मागे घेईनः दिलीप वळसे पाटील

पुणे: मी शरद पवारांना सोडण्याचा निर्णय एकट्याने घेतला नाही तर तो सामुदायिक निर्णय होता. 42 आमदारांची बैठक झाली आणि त्यात हा निर्णय झाला. मला ईडी, सीबीआय किंवा कोणत्याही तपास यंत्रणेची कुठलीही नोटीस आली नाही. आल्याचे दाखविल्यास मी उमेदवारी मागे घेईन. माझ्या जवळच्या लोकांना नोटीस आल्या हे खरं आहे. आमच्यावर कोणताही दबाव नव्हता, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे मानसपुत्र मानले जातात. दिलीप वळसे सलग सात वेळा आंबेगाव मतदारसंघातून आमदार झाले आहेत, प्रत्येकवेळी त्यांच्या प्रचारासाठी शरद पवार होते. यंदा मात्र, शरद पवार यांनी गद्दारांना पाडा असे म्हटले आहे. शरद पवारांचा मानसपुत्र असं मी स्वत: कधीही म्हटलं नाही, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

देवदत्त निकम यांच्यासाठी शरद पवार यांनी आंबेगावात सभा घेतली आणि ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते. महाराजांसोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांना कधी सोडलं का? त्यामुळं आपल्यासोबत गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत. एबीपी माझाशी संवाद साधताना शरद पवार यांच्या बाबत बोलताना दिलीप वळसे पाटील भावूक झाल्याचे दिसून आले.

शरद पवारांनी कौटुंबीक संबंध नव्हते, असं म्हटले, त्यावर बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, ‘मी स्वत: कधीही म्हटलं नाही की, मी शरद पवारांचा मानसपुत्र आहे. लोक तसं म्हणायचे. सार्वजनिक समारंभामध्ये कुटुंबं एकत्र आली, म्हणजे कौटुंबीक संबंध होते असं होतं नाही. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा वहिनी भिमाशंकरला दर्शनाला आल्या की आमच्या घरी यायच्या. मी ग्रॅज्यूएट झाल्यावर पंचवीस वर्षांचा असताना शरद पवारांचा पी.ए म्हणून काम सुरु केले. त्यानंतर आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. चाळीस वर्षे घरामध्ये जाणं येणं होतं. जर शरद पवार म्हणत असतील तर कौटुंबीक संबंध नसतील.’

‘शरद पवार आणि माझे वडील एकाच वेळी 1967 ला आमदार झाले. शरद पवार म्हणाले की, त्यावेळी माझे वडील त्यांच्या मागे पहाडासारखे उभे राहिले होते. शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर मिसेस पवार, मिसेस शिंदे, आमच्या घरी आल्या. तेव्हापासुन येणं सुरु होतं. माझ्या मुलीचे सुप्रिया सुळेंसोबत कौटुंबीक संबंध नव्हते. राजकीय संबंध होते. यशवंतराव चव्हाण सेंटरला त्या एकत्र काम करत होत्या. शरद पवारांनी कौटुंबीक संबंध नव्हते असं म्हटल्याने वेदना झाल्या, जर एखादी व्यक्ती चाळीस वर्षे ये-जा करत असेल. तर त्याला कसले संबंध म्हणायचं हे लोकांनी ठरवायचं आहे,’ असेही यावेळी वळसे पाटील म्हणाले

शरद पवार यांनी असे म्हटल्याने माझ्या कुटुंबाला देखील त्रास झाला. मी, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ वगैरे जवळचे असल्याने शरद पवारांचा आमच्यावर राग असेल. शरद पवार आणि आमचे संबंध पुन्हा पुर्वीसारखे होतील का? हे शरद पवार सांगू शकतील, असे ते म्हणालेत. सभेबाबत बोलताना वळसे पाटील म्हणाले, ‘अजित पवारांची सभा आमच्याकडे नको हे आम्हीच त्यांना सांगितले. सभेसाठी मोठी तयारी करावी लागते आणि त्यात वेळ जातो.’

Live Video: दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ रांजणगावमध्ये महिला निर्धार मेळावा; पाहा कोण काय म्हणाले…

शरद पवार यांच्या टीकेनंतर दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय…

Live Video: दिलीप वळसे पाटलांनी गद्दारी केली, गद्दारांना सुट्टी नाही, त्यांना पराभूत करा: शरद पवार

‘दिलीप वळसे पाटील यांचे काय चालले आहे? यावर आढळराव पाटील म्हणाले…

Video: शिरूर मतदारसंघातील ४२ गावांमधील नागरिकांची दिलीप वळसे-पाटील यांच्यावर प्रचंड नाराजी…

शिरुर तालुक्यातील ‘मलिदा गॅंग’ पासुन तालुक्यातील तरुणांनी सावध राहण्याची गरज…?

Loading ...
शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाणे अंतर्गत मेट्रोबाबतचे गैरसमज दूर करा; नागरिकांशी संवाद साधा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…

8 तास ago

म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने निवृत्त बँक अधिकाऱ्याची 29 लाखांची फसवणूक; शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा

सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…

11 तास ago

आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांबद्दल काकांचा मोठा दावा

'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…

11 तास ago

एफडीएची राज्यभर धडक मोहीम! 88 कारवाया, 9.50 कोटींचा बनावट औषधसाठा जप्त; 10 आरोपी गजाआड

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…

11 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसची ‘मंडल यात्रा’; सरकारला वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…

11 तास ago

‘इथेनॉल घोटाळ्याप्रकरणी नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; मोदींनी देशाची माफी मागावी’; हर्षवर्धन सपकाळ

ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…

11 तास ago