शिरूर (तेजस फडके): शिरुर-आंबेगाव मतदार संघात दिलीप वळसे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. पण, त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम यांचे तगडे आव्हान असणार आहे.
शिरुर मतदार संघातील पाबळ, कान्हूरसह १२ गावचा पाणीप्रश्न पुन्हा पेटला असून सन २००९ पासून दिलीप वळसे पाटील या भागातले आमदार असूनही गेल्या १५ वर्षात यावर काहीच तोडगा न निघाल्याने शेतकरी प्रचंड नाराज आहेत. प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधल्यानंतर अनेकांनी दिलीप वळसे-पटील यांच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.
सन २००९ मध्ये शिरुर तालुक्यातील ३९ गावे आंबेगाव तालुक्याला जोडली गेली. त्यानंतर काही वर्षांनी तीन ग्रामपंचायत विभक्त झाल्याने या गावची संख्या ४२ झाली. सलग १५ वर्षे शिरुर तालुक्यातील ४२ गावच्या सर्वसामान्य मतदारांनी दिलीप वळसे पाटील यांना सलग तीन वेळा विधानसभेत पाठवले. परंतु, शिरूर तालुक्यातील पाबळ, केंदुर, कान्हूर मेसाई सह १२ गावचा पाणीप्रश्न मात्र ‘जैसे थे’ च राहिला. त्यामुळे या १२ गावच्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या नाराजीचा फटका या विधानसभेच्या निवडणुकीत दिलीप वळसे-पाटील यांना बसण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे.
केंदुर येथील अनेक शेतकऱ्यांशी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या प्रतिनिधिने संपर्क साधला असता. गेली १५ वर्षे दिलीप वळसे पाटील यांना ४२ गावातून आम्ही विधानसभेवर पाठवले तसेच वळसे पाटील हे गेली २८ वर्षे वेगवेगळ्या खात्याचे मंत्री झाले आहेत. परंतु आमच्या १२ गावच्या पाण्याचा प्रश्न अजुनही जसाच्या तसाच आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही सर्व १२ गावचे शेतकरी वेगळी भुमिका घेणार असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ शी बोलताना सांगितले.
शिरूर तालुक्यातील नागरिकांचे म्हणणे…
– दिलीप वळसे-पाटील हे शिरूर तालुक्यातील फक्त तीन कुटुंबाचेच नेते वाटतात
– पंधरा वर्षांत मंत्रीपद भोगूनही १२ गावचा पाणीप्रश्न सोडवू शकलेले नाहीत
– दिलीप वळसे-पाटील यांच्या जवळचे म्हणजे ‘चहा पेक्षा किटली गरम’ अशी अवस्था
– शिरूर तालुक्यातील ‘मोठे नेते’ वळसे-पाटील यांच्यापेक्षा स्वतःला मोठे समजतात.
– शिरूर तालुक्यातील युवकांना रांजणगाव एमआयडीसीमध्ये डावलले जाते, वळसे पाटील हे काहीच करत नाहीत.
– शिरूर तालुक्यातील बारा गावच्या रस्त्यांची दुरावस्था
– मलठण, लाखेवाडी, चिंचोली, कान्हुर मेसाई या गावातून जाणा-या राज्य महामार्ग ५६ कडे कायम दुर्लक्ष
शिरूर! देवदत्त निकम यांच्यासाठी काही गावात फुलांच्या पायघड्या आणि ज्येष्ठांकडून लोकवर्गणी…
दिलीप वळसे-पाटील यांना पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत जोरदार राडा…
शिरुर-आंबेगाव मतदार संघातील बारा गावच्या पाणीप्रश्नामुळे वळसे पाटलांवर शेतकरी नाराज…?
दिलीप वळसे पाटील यांना भरसभेत अश्रू अनावर…
दिलीप वळसे पाटील यांच्या तत्परतेमुळे वाचला एकाचा प्राण…