पुणे : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मला विचारले ‘दिलीप वळसे पाटील यांचे काय चालले आहे? यावर मी म्हणालो ‘जयंतराव, दिलीप वळसे पाटील हे 100 टक्के मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. माझे मन साफ आहे. माझ्या मनात तेच ओठावर आहे. वळसे पाटलांची जागा मोठ्या मताधिक्क्यानेच निवडून येणार’ असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जयंत पाटील यांच्याबरोबर झालेल्या बंद दरवाजातील चर्चेला पूर्णविराम दिला.
पाबळ भोरशेत (ता. शिरूर ) येथे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या कोपरा सभेत माजी खासदार आढळराव यांनी हा किस्सा सांगितला.
शिवाजीराव आढळराव पाटील पुढे म्हणाले, ‘पाबळ, धामारी, खैरनगर परिसरात दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लागली आहेत. मी देखील दहा-वीस लाख रुपयांची अनेक कामे मार्गी लावली आहेत. आता फुटाणवाडी येथे सभागृहासाठी ४० लाख रुपयांचा निधी आपण आणला आहे. आपल्या भागातून विधानसभेसाठी वळसे पाटील यांनाच मतदान करावे.’
दिलीप वळसे पाटील यावेळी म्हणाले, ‘माझ्या दृष्टीने पाणी हा महत्त्वाचा विषय आहे. भविष्यात पाणी प्रश्न पेटणार आहे. आंबेगाव-शिरूर तालुकावासियांच्या हक्काचे असणाऱ्या डिंभे (हुतात्मा बाबू गेणू जलसागर) धरणातील पाणी बोगदा पाडून पळवून नेण्याचा काहींचा डाव आहे. याविषयी आपण बोगद्याला स्थगिती आणून अर्धी लढाई जिंकली आहे. पुढील पाच वर्षे आपण पाण्यासाठीच लढा देणार आहोत. शिरूर तालुक्यातील 14 गावांचा पाणी प्रश्न प्राधान्याने सोडायला जाणार आहे.’
मतचाचणी! दिलीप वळसे पाटील यांना यंदाची निवडणूक जड जाणार…?
Video: शिरूर मतदारसंघातील ४२ गावांमधील नागरिकांची दिलीप वळसे-पाटील यांच्यावर प्रचंड नाराजी…
शिरूर! देवदत्त निकम यांच्यासाठी काही गावात फुलांच्या पायघड्या आणि ज्येष्ठांकडून लोकवर्गणी…
दिलीप वळसे-पाटील यांना पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत जोरदार राडा…
शिरुर-आंबेगाव मतदार संघातील बारा गावच्या पाणीप्रश्नामुळे वळसे पाटलांवर शेतकरी नाराज…?
दिलीप वळसे पाटील यांना भरसभेत अश्रू अनावर…
दिलीप वळसे पाटील यांच्या तत्परतेमुळे वाचला एकाचा प्राण…