मुख्य बातम्या

शिरूर! देवदत्त निकम यांच्यासाठी काही गावात फुलांच्या पायघड्या आणि ज्येष्ठांकडून लोकवर्गणी…

शिरुर (तेजस फडके): आंबेगाव-शिरुर मतदार संघातील ४२ गावात जागोजागी देवदत्त निकम यांचं जंगी स्वागत होत असुन निकम यांच्यासाठी काही गावात ‘आमदार’ असा मजकुर असलेल्या पायघड्या घातल्या जात आहेत. तर हिवरे गावात एका जेष्ठ व्यक्तीने ‘साहेब हे पाचशे रुपये घ्या आणि तुम्ही आत्ताच गुलाल घ्या’ असे उदगार काढल्याने सभेत टाळयांचा कडकडाट झाला. त्यामुळे आंबेगाव-शिरुर मतदारसंघात यंदा सर्वसामान्य लोक ‘भाकरी’ नक्की फिरवणार असे वातावरण सध्यातरी दिसत आहे.

पुणे जिल्ह्यात सध्या आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघ चर्चेत आहेत. आंबेगाव-शिरुर मध्ये गेली ३५ वर्षेआमदार आणि २८ वर्षे विविध खात्याचे मंत्री राहिलेले दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) विरुद्ध भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या दोघांमध्ये चुरशीची लढत होत आहे. वळसे पाटील यांच्याकडे रांजणगाव MIDC मधील मोठया मोठया कंपनीत वेगवेगळ्या कामांचे ठेके असणारे गब्बर ठेकेदार तर निकम यांच्याकडे सर्वसामान्य कार्यकर्ते असे चित्र आहे.

शिरुर तालुक्यातील हिवरे गावात प्रचार दौरा सुरु असताना गावातल्या पारावर कोपरा सभा सुरु असताना गावातील जेष्ठ व्यक्ती किसन गणपत तांबे यांनी ‘साहेब तुम्ही आताच गुलाल घ्या आणि त्यासाठी हे घ्या तुम्हाला पाचशे रुपये…’ असे म्हणत त्यांनी निकम यांना विजयाचा गुलाल घेण्यासाठी निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याच्या अगोदरच पाचशे रुपये लोकवर्गणी दिली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळेस खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनाही किसन तांबे यांनी ११०० रुपयांची लोकवर्गणी दिली होती.

आंबेगाव-शिरुर मतदार संघात दिलीप वळसे पाटील हे आर्थिक दृष्टया सधन उमेदवार आहेत. त्या तुलनेत देवदत्त निकम हे आर्थिक दृष्ट्या कमकुवत उमेदवार असल्यामुळे आंबेगाव-शिरुर मतदार संघातील ४२ गावातील सर्वसामान्य मतदार निकम यांना मदत म्हणुन प्रचार दौऱ्यात विविध गावांमधून लोकवर्गणी देत असल्याने ही निवडणुक मोठी चुरशीची होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

गेली ३५ वर्षांपासुन आमदार आणि गेल्या २८ वर्षांपासुन वेगवेगळ्या खात्याचे मंत्री असलेल्या दिलीप वळसे पाटील यांचा मतदार संघात मोठा जनसंपर्क आहे. परंतु गेले अनेक वर्षे वळसे पाटील यांच्यासोबत असलेले देवदत्त निकम आता वळसे पाटील यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच हि निवडणुक असुन वळसे पाटलांनी शरद पवार यांची साथ सोडल्यामुळे गावोगावी नाराज झालेले ग्रामस्थ निकम यांच्यासाठी फुलांच्या पायघड्या घालत आहेत.

दिलीप वळसे-पाटील यांना पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत जोरदार राडा…

पवार साहेबांनी आमदार तसेच मंत्रीपद देऊनही संघर्षाच्या काळात त्यांनी साहेबांना सोडल; देवदत्त निकम

शिरुर-आंबेगावच्या ‘वाल्या’चा वाल्मिकी जयंतीच्या दिवशीच देवदत्त निकम यांनी घेतला खरपूस समाचार

शिरुर-आंबेगाव मतदार संघातील बारा गावच्या पाणीप्रश्नामुळे वळसे पाटलांवर शेतकरी नाराज…?

Loading ...
Loading ...
शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago