शिरूर: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला असून, निवडणुकांच्या उमेदवारी अर्ज भरण्यास देखील सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार आणि मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
मंत्री दिलीप वळसे पाटील आज आंबेगाव विधानसभेसाठी आठव्यांदा अर्ज भरत आहेत. मात्र अर्ज दाखल करण्याच्या काही तासांपूर्वी महायुतीतील शिंदे सेनेत फूट पडल्याचे चित्र दिसून आले आहे. दिलीप वळसे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतच राडा झाला आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या आदिवासी विभागाचे प्रमुख विजय आडारी यांनी दिलीप वळसे-पाटील यांना विरोध दर्शविला. मला पक्षाची बैठक असल्याचे सांगून बोलवले. प्रत्यक्षात इथं दुसराच ठराव घेतला जात आहे. मुळातच मला हे मान्य नाही. दिलीप वळसे-पाटील यांनी वेळोवेळी त्रास दिला, माझं जगणं त्यांच्यामुळे कठीण झाले आहे. त्यामुळे मी आणि माझे समर्थक वळसे यांचा प्रचार करणार नाही. आम्ही आत्ताच्या आत्ता पक्षातून बाहेर पडत आहोत, असे जाहीर करत आडारी यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. त्यानंतर राष्ट्रीय युवा सरचिटणीस सचिन बांगर आणि शहराध्यक्ष प्रवीण थोरात सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
मी माझा जीव मुठीत धरून दिवस काढत आहे. फक्त मिटिंग आहे, असे सांगून बोलावले गेले. मात्र त्यांनी मला याबाबतची कोणतीही माहिती दिली नाही. मी जिल्ह्याचा आदीवासी प्रमुख म्हणून काम करतो आहे. मी आत्ता याक्षणी पक्ष सोडला आहे. मी पुढची भूमिका आत्ताच सांगणार नाही, असेही विजय आडारी यांनी म्हटले.
दिलीप वळसे पाटील अन् देवदत्त निकम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची…
पवार साहेबांनी आमदार तसेच मंत्रीपद देऊनही संघर्षाच्या काळात त्यांनी साहेबांना सोडल; देवदत्त निकम
शिरूरचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे निष्ठावंत म्हणून उतरले राजकीय रिंगणात…
शिरुर-आंबेगाव मतदार संघातील बारा गावच्या पाणीप्रश्नामुळे वळसे पाटलांवर शेतकरी नाराज…?
ठाकरे गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कटके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; शिरूर-हवेलीत रंगणार सामना…
विधानसभा मतचाचणी! आंबेगाव-शिरूर; शिरूर-हवेली मतदार संघामधून पसंती कोणाला?