मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यातील दोन नेते महायुतीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत; पाहा नावे…

शिरूर (तेजस फडके): महाविकास आघाडी आणि महायुतीचे स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, यामध्ये महायुतीतील एकूण २६ घटक पक्षांतील नेत्यांना स्टार प्रचारांकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. यामध्ये शिरूर तालुक्यातील दोन नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून यादीत नाव आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेस व इतर घटक पक्षांचे जागावाटप फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. त्याच बरोबर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीत प्रचारासाठी महायुतीतील एकूण २६ जणांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, जे.पी. नड्डा असे एकूण २६ जणांची यादी जाहीर करण्यात आली असून यात शिरूर तालुक्यातील दोन नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली आहे. जनता ( सेक्युलर ) दलाचे प्रदेश अध्यक्ष नाथा शेवाळे आणि जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे या दोन नेत्यांची निवड झाल्याने शिरूर तालुक्यातील कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहेत. प्रथमच शिरूर तालुक्याला स्टार प्रचारक यादीत नाव आल्याने आता या दोन नेत्यांवर राज्यातील विविध भागात प्रचाराच्या माध्यमातून मोठी जबाबदारी असणार आहे.

महायुती घटक पक्ष स्टार प्रचाराकांची यादी पुढीलप्रमाणे :
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी (अजित पवार ) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, आर.पी.आय. गटाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, बहुजन रिपब्लिकन एकता मंच सुलेखा कुंभारे, रयत क्रांती संघटना सदाभाऊ खोत, भाजप प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेना दादाजी भुसे, राष्ट्रवादी ( अजित पवार ) काँग्रेस महाराष्ट्र अध्यक्ष सुनील तटकरे, जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे, जनता ( सेक्युलर ) दलाचे प्रदेश अध्यक्ष नाथा शेवाळे, जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे, युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा, भीमसेना अनिल कांबळे, लहुजी शक्ती सेनाचे अध्यक्ष विष्णु कसबे, अखिल मराठा महासंघचे अध्यक्ष सयाजी दहातोंडे, दलीत पँथरचे अध्यक्ष बाळासाहेब पडवळ, युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष तानसेन ननावरे, राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षाचे अध्यक्ष श्रीहरी बागल, भीमशक्तीचे अध्यक्ष अनिल दगडू कांबळे, लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनाचे अध्यक्ष रधाजी शेळके.

शिरूर! देवदत्त निकम यांच्यासाठी काही गावात फुलांच्या पायघड्या आणि ज्येष्ठांकडून लोकवर्गणी…

दिलीप वळसे-पाटील यांना पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत जोरदार राडा…

पवार साहेबांनी आमदार तसेच मंत्रीपद देऊनही संघर्षाच्या काळात त्यांनी साहेबांना सोडल; देवदत्त निकम

शिरूरचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे निष्ठावंत म्हणून उतरले राजकीय रिंगणात…

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या २७ स्टार प्रचारकांची यादी जाहीर…

Loading ...
Loading ...
शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago