मुख्य बातम्या

Video: स्वतःच्या वयाचा मान राखून बोला, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा

पुणे: लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या १५ प्रदीर्घ निष्क्रिय कारकीर्दीत स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या स्मारकाचा विकास करण्याचा प्रयत्न सोडाच पण साधा विचारही केला नाही, त्यांनी माझ्या शिव-शंभु भक्तीविषयी, माझ्या हिंदुत्वाविषयी बोलणं योग्य नव्हे. त्यामुळे आपल्या वयाचा मान त्यांनी स्वतःच राखावा अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव यांचा उल्लेख टाळून त्यांना सुनावले.

खरं तर स्वराज्य रक्षक संभाजी ही माझी मालिका सन २०२० मध्येच संपली असताना त्यानंतर २ वर्षांनी या मालिकेच्या प्रमोशनसाठी मी स्मारकाचे नाव बदलणं अशी टीका म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे असे मला वाटते. धर्मवीर या उपाधीपेक्षा ‘स्वराज्य रक्षक’ हे विशेषण अधिक व्यापक स्वरुपाचे असून ज्या छत्रपती संभाजीराजांनी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला एकही किल्ला जिंकू दिला नाही. औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूशी ८ वर्ष लढा देत स्वराज्याचे रक्षण केले. त्याअर्थाने विचार केला तर ‘स्वराज्य रक्षक’ हे विशेषण सर्वार्थाने उचित असेच आहे.

आढळराव पाटील यांचे नाव न घेता खासदार डॉ. कोल्हे यांनी त्यांच्यावर शालजोडीतून फटकेबाजी केली. ते म्हणाले की, ज्यांना १५ वर्षांत छत्रपती संभाजी महाराजांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वदूर पोहोचवण्यासाठी काडीचेही काम करता आले नाही. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळात केंद्रात व राज्यात दोन्हीकडे युतीची सत्ता असतानाही एकही महत्वाचा प्रकल्प त्यांना मार्गी लावता आला नाही. निष्क्रिय कारकीर्दीत मतदारसंघाचा विकास करता आला नाही म्हणूनच मायबाप मतदारांनी त्यांना घरी बसवले. ज्या पक्षाने ३ टर्म लोकसभेची उमेदवारी दिली, त्या शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांनी हिंदुत्वाचे सर्टिफिकेट देणे हास्यास्पद आहे. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत एखाद्याला नैराश्य येऊ शकते, परंतु नैराश्यापोटी बेताल वक्तव्य करताना किमान स्वतःच्या वयाचा तरी मान राखावा ही माफक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सध्याच्या परिस्थितीत नेमकं आपण कुणाच्या बाजूने बोलायचं आहे हेच त्यांना ठाऊक नाही. माजी लोकप्रतिनिधी व ज्येष्ठ व्यक्ती म्हणून त्यांच्याविषयी आदर आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी मी प्रतिक्रिया देणं उचित ठरणार नाही. मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनता सूज्ञ आहे. कोण प्रामाणिकपणे विकासाचे कार्य करतंय हे त्यांना पुरेपूर माहिती आहे, असे त्यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago