मेथी हा असा मसाला आहे जो जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानला जातो. मेथीच्या सेवनाने मधुमेहाची समस्या आटोक्यात ठेवता येते. मधुमेह ही आजच्या काळातील एक गंभीर समस्या आहे. मेथीचे दररोज सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांना ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवता येते.
मेथीमध्ये प्रोबायोटिक गुणधर्म असतात. याच्या सेवनाने शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. मेथीच्या दाण्यामध्ये अमिनो अॅसिड असते. अमीनो अॅसिड ब्लड शुगरचे प्रमाण कमी करण्यास आणि त्याची पातळी कमी करण्यास मदत करु शकते. त्यामुळे रक्तातील इन्सुलिनचे प्रमाणही वाढते, आणि मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होतो. मेथीचे सेवन कोणत्या पद्धतीने करता येऊ शकते ते जाणून घेवूयात.
जेवण: जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही तुमच्या जेवणात मेथीचा वापर करु शकता. भाजीत घालून खाऊ शकता. त्यामुळे भाजीची चव वाढण्यासही मदत होऊ शकते.
मेथीचे पाणी: रोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने ब्लड शुगर कंट्रोल राहते. २ चमचे मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि दुसर्या दिवशी सकाळी हे पाणी गाळून प्या.
चावून खा: मेथी चावून खाल्ली तर आणखीनच चांगले आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे दाणे चावून खावे आणि नंतर पाणी प्यावे.
त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…