मुख्य बातम्या

अडवलेला शिवरस्ता अखेर दोन्ही तालुक्यातील प्रशासनाने केला खुला

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातून पन्नास वर्षापासून जुन्नर तालुक्यात जाण्यासाठी पंचतळे -भागडी हा चालू वहीवाटीचा शिव रस्ता एका शेतकऱ्याने दिडमहीन्यापुर्वी अडवला होता. सदरचा रस्ता अडवल्यामुळे नागरीकांची दळणवळणासाठी अडचण निर्माण झाली होती. तो रस्ता खुला करण्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते माऊली ढोमे व सहकाऱ्यांनी जुन्नर व शिरुर तहसिल कार्यालयाकडे हा रस्ता खुला करण्यासाठी लेखी पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला होता.

शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले व त्यांच्या पथकाने तसेच टाकळी हाजी मंडल अधिकारी एकनाथ ढाके, पिंपरखेड तलाठी अमोल थिगळे, जुन्नरच्या निमगाव सावाचे मंडल आधिकारी नितीन चौरे, पिंपरी कावळच्या तलाठी स्वाती जाधव यांच्या टिमने अतिक्रमण बाजूला करत तात्काळ नागरीकांसाठी रस्ता खुला केला आहे.

हा रस्ता खुला केल्यामुळे शेतकरी संघटना व ग्रामस्थांच्या वतीने शिरुरचे तहसिलदार प्रशांत पिसाळ, नायब तहसिलदार स्नेहा गिरीगोसावी, शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलिस उपनिरीक्षक सुनिल ऊगले यांचा नागरी सन्मान करण्यात आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

17 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

17 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

17 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

17 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

17 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

18 तास ago