मुख्य बातम्या

निडर गोरक्ष दलाने कत्तलखान्यात जाणाऱ्या 100 म्हशी व रेडकुंचे वाचवले प्राण

शिरुर (तेजस फडके): अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील निघोज मार्गे कल्याण येथील कत्तलखान्याकडे चार टेम्पोतून 94 म्हशी आणि त्यांचे रेडकू यांची वाहतुक करत असताना निघोज या ठिकाणी निडर गोरक्ष दलाच्या कार्यकर्त्यांनी बुधवार (दि 5 ) रोजी ती वाहने अडवून पोलिसांच्या स्वाधीन केली असुन याबाबत गोरक्षक अक्षय कांचन यांनी पारनेर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे जावेद शेख आणि मतलब कुरेशी या दोन व्यापाऱ्यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण येथुन कत्तल खाण्यासाठी म्हशीचे रेडकू चार टेम्पोगाडीतून कत्तल खाण्यासाठी प्रत्येक गाडीमध्ये दोन कसाई आणि एक ड्रायव्हर अशा पद्धतीने फलटण जि. सातारा येथून पुणे -शिरूर -निघोज आळेफाटा -कल्याण मुंबई येथे जाणार होत्या. परंतु उरुळी कांचन येथील गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना याचा सुगावा लागल्यामुळे त्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि निघोज येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने त्या गाड्या ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केल्या. टेम्पो क्रं MH 03 DV 3968, MH 03 DV 4641, MH 03 DV 7730, MH 03 DV 7731 या चार टेम्पोमध्ये 94 म्हशी आणि त्यांचे रेडकू भरुन कत्तलीसाठी नेताना निघोज मध्ये (दि 5) रोजी पहाटे 1 वाजता गोरक्षक दल आणि निघोज येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी पकडून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले.

यावेळी गोरक्ष दलाचे कार्यकर्ते अक्षय कांचन, निखिल बत्ते, संदीप कावरे, रमेश औटी, धीरेश महांडुळे, ऋषिकेश बोरुडे, शेखर हांडे, वैभव मोरे, ऋषिकेश कामठे, धनश्री म्हस्के, त्याचप्रमाणे भीमदादा लामखडे, बाळासाहेब जगताप, किरण लाळगे, दीपक लाळगे, सत्यम गायखे, शिवम गायखे, योगेश खाडे, शुभम धवन, संकेत कवाद, विलास हारदे या सर्वांच्यामुळे खूप मोठी जीवित हानी टळली. मुक्या प्राण्यांचे जीव वाचले त्यामुळे निघोज ग्रामस्थ आणि उरळीकांचन ग्रामस्थ यांच्यातर्फे सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. याबाबत पारनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून जनावरांना पांजरपोळ येथे हलविणयात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

9 तास ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

23 तास ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

2 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

2 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

2 दिवस ago