मुख्य बातम्या

नवीन वर्षाचा पहिला रविवार ठरला घात वार

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथील उचाळे वस्ती येथील ज्ञानेश्वर (माऊली) प्रभाकर उचाळे या ३२ वर्षीय युवकाचा रविवार (दि १) सायंकाळच्या सुमारास उचाळेवस्ती रोडवर झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ज्ञानेश्वर हा सायंकाळच्या वेळी मोटरसायकल वर चाललेला असताना चार चाकी वाहनाने त्याच धडक दिली या धडकेने रस्त्याच्या कडेने चालत असलेल्या एका व्यक्तीस मोटर सायकल आदळली व त्यामुळे त्या व्यक्तीचा पाय मोडला आहे. अपघातानंतर ज्ञानेश्वर व ती व्यक्ती (नाव समजू शकले नाही) दोघेही बेशुद्ध पडलेले होते.

संध्याकाळची वेळ असल्यामुळे रस्त्याने वाहतूक कमी होती. चार चाकी वाहन आणि धडक दिल्यानंतर सदर वाहन चालक वाहन घेऊन पळून गेला आहे. बराच वेळ अपघाताची कल्पना कोणालाही न मिळाल्यामुळे दोघेही बेशुद्ध अवस्थेत पडून होते. ज्ञानेश्वर याचा डोक्यात जबर मार लागल्याने त्याच्या डोक्याला सूज आली होती. रस्त्याने प्रवास करणारे एका व्यक्तीने रस्त्याच्या कडेला पडलेल्या ज्ञानेश्वर यास पाहिले परंतु डोक्याला सूज असल्यामुळे ओळख पटली नाही, त्याने इतरांना फोन करून कळविले.

मोटर सायकल पाहिल्यानंतर तो ज्ञानेश्वर असल्याची खात्री झाली. त्यास दवाखान्यात आणण्यात आले परंतु तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. दुसऱ्या व्यक्तीस सरकारी दवाखान्यात नेण्यात आले आहे. नवीन वर्षाचा पहिला रविवार हा घात वर ठरला असून टाकळी हाजी गावावर शोककळा पसरली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कुर्ला भूस्खलन दुर्घटना : बाधित कुटुंबांना ४ लाखांची मदत; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सचिन अहिर आक्रमक

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…

12 तास ago

१,२३१ अनुदानित महाविद्यालयांचे कामकाज आता डिजिटल; ‘ई-ऑफिस प्रणाली’चे लोकार्पण

मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…

12 तास ago

विद्यार्थ्यांच्या सूचनांचे चंद्रकांत पाटलांकडून स्वागत; परीक्षा सुरक्षेसह सामाजिक प्रश्नांवर थेट संवाद

मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…

12 तास ago

महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी; फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…

12 तास ago

घोडगंगा कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय

शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना…

12 तास ago

रूसा, पीएम उषा प्रकल्पांना गती द्या; विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा वेळेत मिळाव्यात; चंद्रकांत पाटील

मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…

14 तास ago