मुख्य बातम्या

रांजणगाव MIDC मधील व्हर्लफुल कंपनीच्या गोडाउन मधुन चोरी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी मुद्देमालासहीत केली अटक

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जुलै २०२४ ते १२ ऑगस्ट २०२४ रोजी रांजणगाव एमआयडीसी मधील इंडॉस्पेस लॉजिस्टिक पार्क मधील बी ८०० व्हर्लफुल कंपनीच्या वेअर हाऊस मधील व्हर्लफुल कंपनीचे रचना स्पीड लॉजिस्टिक गोडाऊन मधून मायक्रो ओवन, एसी, फ्रिज, डिश वॉशर, वॉशर असे एकुण २२ लाख ८८ हजार २६ रुपये किंमतीचे सामान चोरीस गेल्याबाबत कंपनीचे मॅनेजर संदीप नारायण पवार (रा. शिरुर, ग्रीनसिटी, गोलेगाव रोड, ता. शिरुर, जि. पुणे यांनी फिर्याद दिली होती.

 

सदरचा गुन्हा दाखल होताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख रांजणगाव MIDC चे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना सदर गुन्हा उघडकिस आणुन मुद्देमाल जप्त करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार वाघमोडे यांनी तपास पथकातील सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विजय सरजिने, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांना सदर गुन्ह्याबाबत कार्यवाही करण्यासाठी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास पथकाने १) बाळू रघुनाथ गायकवाड (रा. दरोडी ता. पारनेर जि. अ.नगर) २) मयूर विलास सरोदे (रा. सरदवाडी, ता.शिरुर, जि.पुणे) ३) संभाजी शिवाजी भोसले, (रा.दरोडी,ता.पारनेर जि. अ.नगर) ४) जावेद उर्फ गौसे अजम नजिर शेख, (रा.हुडको शिरुर, ता. शिरुर जि. पुणे) ५) रमेश रामभाऊ खराडे (रा.कामाठीपुरा, ता.शिरुर, जि.पुणे) यांना अटक करुन सदर आरोपीकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.

 

तसेच त्यांचे इतर साथिदार ६) मुज्जफर रमजान शेख (वय २९ ) रा.दरोडी ता.पारनेर जि.अहमदनगर ७) सलीम मुनीर शेख (वय २८) रा. दरोडी, ता.पारनेर जि. अ.नगर ८) दिपक रामदास मस्कुले (वय ३२) रा.दरोडी, ता.पारनेर जि. अ.नगर यांना अटक करण्यात पोलीसांना यश आले असुन सदर सर्व आरोपी कडुन वेगवेगळ्या ठिकाणावरुन खालील प्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यामध्ये व्हर्लफुल कंपनीचे १) ७१ एसी, २) १९ डबल डोअर रेफ्रिजरेटर, ३) १६ वॉशिंग मशिन, ४) १८ डिश वॉशर, ५) ८५ मायक्रो ओवन ६) ९ सिंगल डोअर रेफ्रिजरेटर ७) ६ ईलेक्ट्रिक शेगडी असा एकूण ३७ लाख १४ हजार २२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात रांजणगाव MIDC पोलीसांना यश आले आहे.

 

सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, शिरुर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पोलिस उपनिरीक्षक सविता काळे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विजय सरजिने, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, पोलिस हवालदार विलास आंबेकर, तेजस रासकर यांनी केली आहे सदर गुन्ह्यांचा पुढील अधिक तपास मनोजकुमार नवसरे हे करत आहेत.

शिरुरमध्ये महिलांचे अनोखे रक्षाबंधन राखी सामाजिक प्रश्नांची अन ओवाळणी महिला सुरक्षेची

मंगलदास बांदल यांच्या घरावर पुन्हा ईडीची धाड

तुम्हाला मुख्यमंत्र्याचे नाव आणि फोटो चालत नाही, मग शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याचं उचलायच्या का…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

22 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

22 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

22 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

22 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

22 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

22 तास ago