तुम्हाला मुख्यमंत्र्याचे नाव आणि फोटो चालत नाही, मग शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याचं उचलायच्या का…?

राजकीय शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) रविवार (दि १८) रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुन्नर येथे जनसंवाद यात्रेच्या कार्यक्रमावर तसेच त्यानंतर झालेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर शिरुर-आंबेगाव येथील शिवसेनेच्या शाखाप्रमुखापासुन ते जिल्हाप्रमुखापर्यंत सर्वच कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकला होता.

 

शिवसेनेचे युवा जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे म्हणाले, महायुती मध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र आहेत. परंतु कालच्या अजित पवार यांच्या मंचर येथील कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ऐवजी माझी लाडकी बहीण अशा आशयाचे बॅनर लावले होते. तसेच मुख्यमंत्र्याचा फोटोही बॅनरवर टाळण्यात आला. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज झाले. या नाराज कार्यकर्त्यांनी मंचर येथील कार्यक्रमावरच बहिष्कार टाकला.

 

शिरुर-आंबेगावचे आमदार व सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः मला फोन करुन या कार्यक्रमाला सर्व शिवसैनिकांना घेऊन या असे सांगितले होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनसंवाद यात्रेसाठी छापलेल्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो नव्हता. तसेच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ऐवजी’माझी लाडकी बहीण योजना’ असा मजकुर छापला होता. त्यामुळे आम्ही सर्व शिवसैनिकांना सदर कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. तसेच शिरुर-आंबेगाव मध्ये विधानसभेसाठी अजुन उमेदवार म्हणुन कोणाचेही नाव जाहीर झालेले नाही तसेच वरिष्ठाकडून त्याबाबत आम्हाला कसलाही आदेश आलेला नाही. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेतही अनेक उमेदवार इच्छुक आहेत. कारण हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे.

बापुसाहेब शिंदे

जिल्हाध्यक्ष, शिवसेना (युवासेना)

मंगलदास बांदल यांच्या घरावर पुन्हा ईडीची धाड

शिरुरमध्ये महिलांचे अनोखे रक्षाबंधन राखी सामाजिक प्रश्नांची अन ओवाळणी महिला सुरक्षेची

शिरुरचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्यासह एपीआय रमेश कदम यांनी तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप