मुख्य बातम्या

‘रांजणगाव मॅरेथॉन’ स्पर्धेचे होणार मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन

शिरुर (तेजस फडके) आर एम धारीवाल फाउंडेशनच्या वतीने 11 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता ‘रांजणगाव मॅरेथॉन’ 2022 या स्पर्धेचे आयोजन रांजणगाव गणपती येथे होत असून या स्पर्धेच्या पाचव्या पर्वाचे उद्घाटन सिनेअभिनेते श्रेयस तळपदे यांच्या हस्ते होणार असुन या स्पर्धेसाठी आर एम धारीवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल, उपाध्यक्षा शोभा धारीवाल, इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष पुनित बालन, माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडु, पुणे विभागाचे लाच-लुचपत विभागाचे आयुक्त अमोल तांबे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कोरोनानंतर सर्वसामान्य लोकांमध्ये आरोग्याविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली असून दोन वर्षांनंतर ही स्पर्धा होत असल्याने शिरुर तालुक्यासह संपुर्ण महाराष्ट्रातुन धावपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तसेच या स्पर्धेत २ लाखांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली असुन या स्पर्धेसाठी ‘महागणपती फाउंडेशन’ यांचेही सहकार्य राहणार आहे. शिरुर तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार असून हि स्पर्धा सर्वसमावेशक असल्याने या स्पर्धेत शिरुर तालुक्यातील सर्व नागरीकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग राहणार आहे.

रांजणगाव मॅरेथॉन स्पर्धेचे ऑफलाईन रजिस्ट्रेशन सुरु…

आर एम धारीवाल फाउंडेशन व महागणपती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रांजणगाव गणपती येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे येत्या रविवारी आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागासाठी शेवटचे दोनच दिवस राहिलेले असून ज्या स्पर्धकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी अडचणी आल्या व ज्यांचा सहभाग घ्यायचा राहिला आहे त्यांच्यासाठी हि शेवटची संधी असणार आहे असे आयोजक सागर पाचुंदकर यांनी सांगितले. स्पर्धेचे रजिस्ट्रेशन राजमुद्रा चौक येथे मॅरेथॉन च्या ग्राउंडवर चालु आहे, तेथे जाऊन प्रत्यक्ष फार्म भरावा किंवा 9595689696 या नंबरवर संपर्क साधावा. तसेच रांजणगाव मॅरेथॉन स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9595689696 आणि 9657663383 या नंबरवर संपर्क करावा. तसेच Online Registration https://www.townscript.com/c/ ranjangaon-marathon यासाठी लिंकवर क्लिक करा.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

4 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

23 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago