आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या अंत्यविधीला हजारोंचा जनसमुदाय

मुख्य बातम्या

शिरुर: भाजपचे ज्येष्ठ नेते शिरुर हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्यावर शोकाकुल वातावरणात सायंकाळी तर्डोबाची वाडी (ता.शिरूर) येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिरुरचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे गुरुवार (दि.११) रोजी सकाळी निधन झाले होते.त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांचे बाबूराव नगर येथील निवासस्थानी नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.यावेळी अनेक नागरिकांनी दर्शन घेतले. त्यानंतर शिरुर शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. निर्माण प्लाझा ते बाजारसमिती येथे पार्थिव नेण्यात आले. एस टी बस स्थानक पुणे नगर रस्त्यावरून बी. जे.कॉर्नर ते तर्डोबची वाडी अशी अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते.सायंकाळी उशिरा शिवतारा पर्यटन केंद्रात अंतिम संस्कार करण्यात आले.यावेळी त्यांचे चिरंजीव राहुल यांनी मुखाग्नी दिला.

या अंत्यविधीला माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, दौंड चे आमदार राहुल कुल, शिरुर चे माजी आमदार पोपटराव गावडे, आमदार निलेश लंके, माजी आमदार विजय औटी, माजी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माऊली कटके, जालिंदर कामठे, माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरिअन, माजी नगराध्यक्षा वैशाली वाखारे, शिवसेना नेत्या जयश्री पलांडे, माजी बाजार समिती सभापती शशिकांत दसगुडे,  माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर, शिरुर आंबेगाव राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, भाजपचे ज्येष्ठ नेते दादा पाटील फराटे, भाजपचे तालुकाध्यक्ष आबा सोनवणे, माजी तालुकाध्यक्ष भगवान शेळके आदी सह शिरुर हवेलीतील हजारो नागरिक उपस्थित होते.