न्हावरे (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे गावात कडवळ तोडण्याच्या वादातून एका महिलेसह तिच्या पती व नातलगावर लोखंडी गज व लाकडी काठ्यांनी हल्ला करण्यात आला. या घटनेत तिघेजण जखमी झाले असून सात आरोपींविरुद्ध शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी साधना शंकर देशमुख (वय ३६) रा. न्हावरे, ता. शिरुर, जि. पुणे) या दि ०३ जून २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास पती शंकर देशमुख व भावजय यशश्री हिंगे यांच्यासह शेत गट नं. २६४ मधून तोडलेले कडवळ मोटारसायकलवरुन नेत होत्या. त्याचवेळी गावच्या हद्दीत न्हावरे ते चिंचणी रोडवर आरोपींनी संगनमत करुन मोटारसायकल अडवून “हे आमच्या बापाच्या रानातील कडवळ आहेत, तुम्ही कसे काय तोडताय” असे म्हणत अचानक हल्ला केला.
या हल्ल्यात लोखंडी गज, लाकडी काठ्या व लाथाबुक्क्यांनी फिर्यादीसह त्यांच्या वडिलांना त्रिंबक दादाभाऊ हिंगे आणि पती शंकर देशमुख यांना गंभीर दुखापत केली. फिर्यादीच्या पतीचे दोन दात पडले असून दोघांच्या हाताला चावाही घेतल्याची माहिती आहे.
तसेच आरोपींनी “पुन्हा आमच्या रानात आलात तर जीवंत सोडणार नाही” अशी धमकी देत साधना शंकर देशमुख, त्रिंबक दादाभाऊ हिंगे, शंकर देशमुख यांना मारहाण केल्याने ते जखमी झाले आहेत. तसेच याबाबत साधना देशमुख यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असुन मंदा हनुमंत देशमुख, कांचन महेश देशमुख, रुपाली हनुमंत देशमुख, प्रियंका जगदाळे, महेश हनुमंत देशमुख, तुकाराम जयवंत देशमुख, हनुमंत जयवंत देशमुख (सर्व रा. न्हावरे, निंबाळकरवस्ती, ता. शिरुर, जि. पुणे) या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास सहाय्यक फौजदार शिवाजी बनकर हे करत आहेत.
शिरुर तालुक्यात निवडणुकीत पराभव झाल्याच्या रागातुन तलवारीने हल्ला; गुन्हा दाखल
रांजणगाव येथील तिहेरी खून प्रकरणाचा अवघ्या १२ दिवसांत उलगडा पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी
शिरुर तालुक्यात रस्त्याच्या कामादरम्यान टँकरच्या धडकेत मजुराचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल
रांजणगाव गणपती (तेजस फडके) लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एकता दिवस (Run…
कोरेगाव भीमा (ता. शिरूर): पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा येथील डिंग्रजवाडी फाट्याजवळ आज (गुरुवार) आठवडे बाजाराच्या…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) सायबर अवेअरनेस २०२५ उपक्रमाच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस विभागातर्फे रांजणगाव एमआयडीसी…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव गणातून पंचायत समिती निवडणूक लढवणार आहे, असा ठाम विश्वास…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २७) दुपारी एक भावनिक…
शिरूर : राज्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान…