शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहत (MIDC) टप्पा क्रं ३ करडे येथील औद्योगिक वसाहतीत रस्त्याचे काम घेतल्याच्या कारणावरुन दोन जणांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी शिरुर पोलिस स्टेशन येथे वैभव महाडिक, शुभम दिवेकर, अक्षय महाडीक, पंडीत देवकर, रणजित वाळके, अमोल बांदल व इतर दोन अनोळखी इसमांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संकेत संतोष महामुनी (वय २५) बांधकाम व्यावसायिक (रा.सरदवाडी ता.शिरुर, जि.पुणे) याने शिरुर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असुन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २१ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास करडे गावच्या हददीत आय एफ बी (IFB) कंपनी चौकात संकेत महामुनी आणि त्याचा मित्र सुरज पाडळे त्यांच्या चारचाकी क्रं एम एच १२ यु डब्ल्यु ०२२४ ने करडे ‘एमआयडीसी’ त आले असता असता. वैभव महाडिक आणि शुभम दिवेकर यांनी मोटारसायकल आडवी लावत “तु एम आय डी सी चे रस्त्याचे काम का घेतले तुला खुप माज आला आहे. तु या आधी पण मला नडला आहे असे बोलत वैभव महाडिक याने त्याच्याकडील पिस्टलच्या उलट्या बाजुने संकेत महामुनी याच्या डोक्याला आणि ओठाला मारहाण करत जबर दुखापत केली. तसेच सुरज पाडळे याच्याही डोक्याला पिस्टलने मारहाण करत दुखापत केली.
तसेच त्यावेळी इनोव्हा व लाल रंगाची स्विफ्ट कार नंबर माहीत नाही. यामधुन अक्षय महाडीक, पंडीत देवकर, रणजित वाळके, अमोल बांदल व अनोळखी दोघे नाव पत्ता माहीत नाही हे आले. त्यांनी संकेत व सुरज यास मारहाण करत शिवीगाळ दमदाटी केली अक्षय महाडीक याने संकेत याच्या उजव्या कानास दगडाने मारहाण करत जबर दुखापत केली. तसेच वैभव महाडीक याने संकेत याच्या खिशातील विवो कंपनीचा मोबाईल व गळयातील सोन्याची चैन काढुन घेतली. आणि त्याच्या चारचाकी कारच्या काचा दगडाने फोडल्या. तिचे दगडाने ठिकठिकाणी नुकसान केले तसेच सुरज पाडळे याच्या डोक्यास व हाताला दुखापत केली आहे. शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर शेळके हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
शिरुर; माजी सैनिकाच्या पत्नीची कंपनीच्या भागीदारीत फसवणुक करत जिवे मारण्याची धमकी
कुणी न्याय देईल का न्याय…? माजी सैनिकाच्या पत्नीची आर्त हाक; आरोपी अद्यापही मोकाट
शिरुर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर माजी सैनिक पत्नीचा गंभीर आरोप; पोलिस अधिक्षकांकडे तक्रार
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …