मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यात अनैतिक संबंधातून बालकांचे अपहरण; चिमुकलीला फेकले विहिरीत…

शिरूर: शिरूर तालुक्यातील वाडागाव येथील तीन लहान चिमुकल्यांचे एका युवकाने अपहरण करुन एका चिमुकलीला विहिरीमध्ये फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिसांनी दोन बालकांची सुटका करत आरोपीला अटक केली आहे.

गायत्री रणजीत कुमार रविदास (वय ७ रा. वाडागाव ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. झारखंड) असे खून केलेल्या चिमुकलीचे नाव असून, तिचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आहे. पोलिसांनी बबन रामपीर यादव (वय ४२ रा. कल्याणी फाटा, कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. उत्तरप्रदेश) याला अटक केली आहे.

वाडागाव यथील गायत्री, कार्तिक रविदास आणि अभिजित पासवान (दोघे वय तीन वर्षे) ही चिमुकली शनिवारी (ता. २२) बेपत्ता झाले होते. याबाबत विनादेवी रणजीतकुमार रविदास या महिलेने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर अपहरण प्रकरणी गुन्हे दाखल केला. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पो. नि. दिपरतन गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पो.नि. अविनाश शिळीमकर, पो. उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, सहाय्यक उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार, पो. हवा. आत्माराम तळोले, रोहिदास पारखे, नवनाथ नाईकडे, किशोर तेलंग, शिवाजी चितारे, जयराज देवकर, अमोल दांडगे, औदुंबर वाघमारे, ललित चक्रनारायण आदींनी बालकांचा शोध सुरु केला. परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता बबन यादव हा दुचाकीहून तिघा बालकांना घेऊन गेल्याचे समोर आले.

पोलिसांनी सीसीटीव्ही तपासात थेट खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव गाठले. त्यांनतर सदर ठिकाणहून बहुल गावातून बबन हा तिघांपैकी दोघा बालकांना पुन्हा शिक्रापूर दिशेने येताना दिसला. पोलिसांना त्यांनतर काही वेळात दोन बालके रस्त्यावर मिळून आली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत बबनचा शोध घेतला असता रात्रीच्या सुमारास पोलिसांनी बबन यादव याला ताब्यात घेतले असता बहुळ गावातील एका विहिरीमध्ये गायत्रीला टाकून दिल्याचे सांगितले.

शिक्रापूर, शिरुर, रांजणगाव पोलिस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी सदर ठिकाणी शोध घेतला. दरम्यान पुणे महानगर प्रादेशिक परिवहन विभागाचे अग्निशमन अधिकारी प्रकाश मदने, महेश पाटील, प्रशांत अडसूळ, उमेश फाळके, अल्ताफ पटेल, आपदा मित्र वैभव निकाळजे, राहुल काटे, राज जावळे, प्रेम निकाळजे, रोहित शिंदे, निखिल काळे, राहुल गायकवाड, यश शिंदे, राहुल पवळे आदींनी सदर विहिरीमध्ये शोध घेतला असता गायत्रीचा मृतदेह आढळून आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड हे करत आहेत.

दरम्यान, वाडागाव येथून अपहरण झालेली तिनही बालकांचे कुटुंबीय व आरोपी हे परप्रांतिय असून मृत गायत्रीच्या मावशी बरोबर आरोपीचे अनैतिक संबंध होते. मात्र त्याला गायत्रीची आई आणि इतर कुटुंबीयांचा विरोध असल्याने या सर्वांना धडा शिकवायचा म्हणून वरील तिनही बालकांचे आपण अपहरण केल्याचे आणि गायत्रीला विहीरीत टाकल्याचे आरोपीने पोलिसांना प्राथमिक तपासात सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिरूर तालुक्यात पत्नीच्या विरहाने पतीची गळफास घेऊन आत्महत्या…

शिरूर तालुक्यात बापानेच केला मुलीचा खून…

शिरूर तालुक्यात ज्येष्ठ नागरिकाला पुतण्याकडून बेदम मारहाण…

शिरूर तालुक्यात मिस्त्रीचे काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार…

शिरूर! महाविद्यालयीन युवतीचा साखरपुडा झालेला असताना रस्त्यात अडवले अन्…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

3 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

12 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

12 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

13 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

18 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

18 तास ago