मुख्य बातम्या

शिरुर मधील युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लबच्या दोन नेमबाजांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

शिरुर (तेजस फडके) मुंबई येथे ५ ते ९ जून दरम्यान पार पडलेल्या कॅ. येस. जे. इझेकीयल राज्यस्तरीय १० मीटर पीप साईट एअर रायफल शूटिंग स्पर्धा ही अत्यंत चुरशीची ठरली. या स्पर्धेत शिरुरच्या युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लबच्या दोन नेमबाजांनी आपली चमकदार कामगिरी सादर करत सर्वांचे लक्ष वेधुन घेतले.

युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लबच्या संदेश दत्तात्रय भोंडवे तसेच अभय सुरेश पाटील या दोघांनी उत्कृष्ट कामगिरी केली असुन ऑक्टोबर २०२५ मध्ये होणाऱ्या पुर्व राष्ट्रीय स्पर्धेसाठी या दोघांची निवड झाली आहे.

हे दोघेही शिरुर येथील श्री. छत्रपती संभाजी शिक्षण संस्था अंतर्गत असलेल्या युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लबमध्ये नियमित सराव करतात. त्यांना प्रशिक्षक शरद तरटे यांचे मार्गदर्शन लाभले असुन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र थिटे व उपाध्यक्ष धनंजय थिटे यांनी या यशस्वी नेमबाजांचे विशेष अभिनंदन करत त्यांना आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती शिरुरचे संचालक बंडू जाधव, ज्ञानसागर कोचिंग क्लासेसच्या संचालिका माया नितीन भोंडवे, तसेच क्रांती प्रतिष्ठान संचालित श्लोक पोलीस अकॅडमीचे संचालक अविनाश परांडे (सर) आणि प्रशांत वाळुंज (सर) यांनी या यशस्वी नेमबाजांचे अभिनंदन केले आहे.

युनिक शुटिंग स्पोर्ट्स क्लबचे हे यश शिरुरसह संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असुन युवा खेळाडूंनाही प्रेरणादायी ठरणार आहे.

रांजणगाव येथील तिहेरी खून प्रकरणाचा अवघ्या १२ दिवसांत उलगडा पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी

शिरुर तालुक्यात निवडणुकीत पराभव झाल्याच्या रागातुन तलवारीने हल्ला; गुन्हा दाखल

शिरुर तालुक्यात ग्रामपंचायत निधीचा अपहार; तत्कालीन सरपंचांसह दोघांवर गुन्हा दाखल

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

10 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

13 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

15 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago