शिरूर तालुका

मांडवगण फराटा येथील श्री वाघेश्वर विद्याधाम योगासन स्पर्धेत घवघवीत यश

मांडवगण फराटा (संपत कारकुड) पुणे जिल्हा परिषद पुणे आणि जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय योगासन स्पर्धा जे जे इंटरनॅशनल स्कूल करंदी येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत शिरुर तालुक्यातील ४० शाळांतील दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा मुले व मुलींच्या १४ वर्ष, १७ वर्ष आणि १९ वर्ष अशा तीन वयोगटातून खेळल्या गेल्या.

 

या तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत वाघेश्वरचे एकूण १८ विद्यार्थ्यांनी विविध गटातुन सहभाग नोंदवला. त्यापैकी पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झालेली आहे. १७ वर्षे गटातुन प्रथम क्रमांक कुमारी चैत्राली सोपान वाबळे, चतुर्थ क्रमांक साहिल उल्हास शितोळे. १९ वर्षे वयोगटातून प्रथम क्रमांक उदय अशोक जगताप, तृतीय क्रमांक वेदांत पतंगराव शिंदे, चतुर्थ क्रमांक अथर्व भागवत कारखिले या पाच विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवर निवड करण्यात आली आहे.

 

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रिडाशिक्षक बी. पी .येवले ,योग मार्गदर्शक, आर वाय कांबळे , गायकवाड, अमित माने, प्रशांत वाळुंज, नितीन गवळी विजय कराळे, मिलिंद निंबाळकर, स्वाती दळवी, मनीषा कारखिले यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक अध्यापकांचे संस्थेचे अध्यक्ष अनिल बोरा, शालेय समिती अध्यक्ष प्रकाश बाफणा, सचिव प्राचार्य नंदकुमार निकम, प्रशालेचे प्राचार्य रामदास चव्हाण, उपप्राचार्य गणपत बोत्रे , पर्यवेक्षिक संपदा वेताळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश ढमढेरे, उपाध्यक्ष बालाजी कांबळे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सचिन फराटे व सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.

शिरुर संवादिनी तर्फे डेक्कन एज्युकेशन सोसायटी शाळेत ओळख स्पर्शाची हा स्तुत्य उपक्रम

शिरुर ST बस स्थानकातील अस्वच्छ शौचालयाबाबत रामलिंग महिला उन्नतीचे निवेदन; मागण्या न झाल्यास उपोषण

मांडवगण फराटा इथं किरकोळ कारणावरुन जेष्ठ महिलेला शिवीगाळ व मारहाण करत दिली जिवे मारण्याची धमकी

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

14 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

15 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

15 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago