मुख्य बातम्या

ज्यांच्या विरोधात वीस वर्षे संघर्ष केला, त्यांच्याकडुनच उमेदवारी घेतल्याने आढळराव यांच्यावर मतदार नाराज…?

शिरुर (तेजस फडके) गेली वीस वर्षे सतत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात निवडणुक लढवली. शरद पवारांसह, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहीते पाटील यांच्यासह अनेक नेत्यांवर टिका केली. तसेच अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा जरी माझ्या विरोधात उभे राहिले. तरी माझा पराभव होऊ शकत नाही अशा वलग्ना करणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटलांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नाईलाजाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन (अजित पवार गट) उमेदवारी घ्यावी लागली. त्यामुळे अनेक सर्वसामान्य मतदार सध्या नाराज असल्याचे चित्र दिसत आहे.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तीन वेळा शिरुर लोकसभा मतदार संघांचे नेतृत्व केले. शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे प्राबल्य असताना तीनही निवडणुकीत सलग 15 वर्षे शिवाजीराव आढळराव पाटील यांना जनतेने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल दिला. परंतु शेवटच्या पाच वर्षात मात्र आढळराव यांचे मतदारसंघात दुर्लक्ष झाल्याने तसेच डॉ अमोल कोल्हे हे अभिनेते असल्यामुळे शिवाजीराव आढळराव यांचा निवडणुकीत पराभव झाला.

पाच वर्षात तीन पक्ष अन सत्ता हेच लक्ष…
शिवाजीराव आढळराव यांनी शिवसेनेच्या तिकिटावर सलग 15 वर्षे लोकसभा निवडणुक लढवली आणि त्यात ते विजयी झाले. परंतु महाराष्ट्रात मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी तयार झाली. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळालं. त्यानंतर सगळं काही सुरळीत चालु असताना एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आणि आढळराव पाटील हे ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात सामील झाले.

तिकिटासाठी परत अजित पवार गटात प्रवेश…
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली. त्यानंतर काही दिवसांनी सगळ्यांना धक्का देत अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पाडत स्वतःच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ घातली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात उभी फूट पडल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिंदे गटातून पुन्हा आढळराव पाटलांनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे लोकसभा मतदार संघातील अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शिंदे गटातील कार्यकर्ते नाराज…?
सध्या शिवाजी आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्या कडुन निवडणुकीच्या रिंगणात उतरले असुन आता माझी हि शेवटची निवडणुक असल्याची भावनिक साद ते मतदारांना घालत आहेत. परंतु सध्या प्रचार यंत्रणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली असुन शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना दुय्यम वागणुक देण्यात येत असल्यामुळे कार्यकर्ते नाराज असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. वीस वर्षे ज्यांना टोकाचा विरोध केला. आता नाईलाजाने त्यांच्यासोबतच प्रचार करायची वेळ आली असे अनेक शिवसैनिक (शिंदे गट) खाजगीत सांगत असुन प्रचारामध्ये सुद्धा आम्हाला दुय्यम वागणुक मिळत असल्यामुळे उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याचा पश्चाताप होत असल्याचेही काही कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

माजी आमदार विलास लांडे नाराज नाहीत: शिवाजीराव आढळराव पाटील

शिरूरमधील राजकारण तापलं! आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना फटकारलं…

शिरूर लोकसभा निवडणूक! शिवाजीराव आढळराव पाटील की अमोल कोल्हे?

शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश…

दिलीप वळसे पाटील आणि मी काही वैरी नाहीः आढळराव पाटील

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…

शिरुर (तेजस फडके) 'गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवत आहात. तुम्ही १५ वर्षे खासदार असताना…

8 तास ago

शिरुर ग्रामीण मध्ये डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मैदानात

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर…

23 तास ago

शिरुर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकत दोन गांजा विक्रेते तसेच गांजा ओढणाऱ्या दोन जणांवर केली कारवाई

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औ‌द्योगीक वसाहतीमध्ये काही ठिकाणी अवैधरीत्या गांजाची चोरुन…

23 तास ago

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी संतोष सुभाष चौधरी यांनी विषारी औषध…

2 दिवस ago

शिरुर; शेतकऱ्याचे महाडीबीटी योजनेतील 24 हजार अनुदान वर्षभरातही सरकारला देता येईना…

शिरुर (तेजस फडके) सध्या राज्यात लोकसभेची रणधुमाळी चालु असुन मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी किती चांगल्या योजना…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाण्यातून विषबाधा ९ शेळ्यांसह ५ मेंढ्यांचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे) एकीकडे दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे तहानलेल्या शेळ्या…

2 दिवस ago