मुख्य बातम्या

शिरुर येथे महिलांचा एक दिवस लाक्षणिक उपोषण करत मराठा आरक्षणास पाठिंबा

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण आंदोलन सुरु केलेले मनोज जरांगे पाटील याना पाठिंबा देण्याकरिता मराठा क्रांती मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांनी शिरुर तहसिल कार्यलयाच्या आवारात आज (दि 12) रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करत आंदोलन केले. यावेळी मराठा समाजास आरक्षण तातडीने जाहीर करावे अशी आग्रही मागणी करण्यात आली.

 

आज दिवसभरात उपोषण स्थळी शिरुर तालुक्यातील विविध संस्था संघटना यांच्या प्रतिनिधीनी महिलांना भेट देवुन पाठिंबा दिला. सायंकाळी 5 च्या दरम्यान नायब तहसिलदार स्नेहा गिरीगोसावी तसेच पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या हस्ते लिंबू सरबत घेवुन हे उपोषण सोडण्यात आले.

 

यावेळी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणकर्त्या राणी कर्डीले, श्रुतिका झांबरे, वैशाली गायकवाड, शशिकला काळे, सुवर्णा सोनवणे यांना पाठिंबा देण्यासाठी सविता बोरुडे, प्रीती बनसोडे, मोनिका राठोड, राणी शिंदे, छाया हारदे, शोभना पाचंगे, कल्पना पुंडे, जया खांडरे, मीना गवारे, वैशाली बांगर, प्रियंका बंडगर, संगीता रोकडे, डॉ वैशाली साखरे, कोमल वाखारे, मनीषा कालेवार, राजश्री ढमढेरे, ज्योती हांडे, संगीता शेवाळे, तज्ञिका कर्डिले, प्रिया बिरादार, मिरा परदेशी, सुजाता पाटील, विजया टेमगिरे, कविता वाटमारे, जिजाबाई दुर्गे, मंजू भारती तसेच ॲड रवींद्र खांडरे, डॉ. सुभाष गवारी, गणेश जामदार, रंजन झांबरे, उमेश शेळके, रमेश दसगुडे, रुपेश घाडगे, अविनाश घोगरे, कुणाल काळे आदी उपस्थित होते.

आंदोलनकर्त्या महिलांचा मनोज जरांगेशी संवाद…

यावेळी उपोषणकर्त्या राणी कर्डीले यांनी व्हिडीओ कॉलद्वारे जालना येथील मनोज जरांगे यांच्याशी संपर्क साधुन आम्ही शिरुर मधील सर्व महिला तुमच्या पाठीशी असुन तुमच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आम्ही तहसीलदार कार्यालयाच्या आवारात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत असल्याचे सांगितले. यावेळी मनोज जरांगे यांनी उपस्थित सर्वचं महिलांचे आभार व्यक्त करत धन्यवाद दिले.

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

3 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

3 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

5 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

5 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

5 दिवस ago