crime
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील दरेकरवाडी येथील एका युवकाने एका अल्पवयीन मुलीची काही कामानिमित्त ओळख निर्माण झाल्यानंतर ओळखीचा गैरफायदा घेत पिडीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला असल्याने शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दरेकरवाडी येथील आरोपी शुभम गणेश दरेकर याने पिडीत मुलीची ओळख वाढवून तिचा विनयभंग करीत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यामुळे पिडीतेच्या तक्रारीनुसार आरोपी शुभम याच्यावर शिक्रापूर पोलिसांनी बाललैंगिक आत्याच्यार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तसेच विनयभंगाचाही गुन्हा दाखल केला. आरोपी शुभम दरेकर याला शिक्रापूर पोलिसांनी तात्काळ अटक केल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे करीत आहेत.
शिरूर तालुक्यात रक्षाबंधनासाठी भावाकडे जाण्याच्या तयारीत असतानाच बहिणीचा मृत्यू…
शिरूर तालुक्यात युवकाचा खून; खुनी दोन तासात पोलिसांच्या ताब्यात…
शिरूर पोलिस स्टेशन आवारातील २२० वाहने मिळणार मालकांना…
शिरुर तालुक्यात ड्रोनच्या सहाय्याने पकडली दोन कोटींची वीजचोरी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शिरुर तालुक्यात गावठी पिस्टल जवळ बाळगल्याने एकावर गुन्हा दाखल; आरोपीस अटक
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…