शिरुर (किरण पिंगळे): तुम्हा मुलींच्या प्रत्येक सुख आणि दुःखात आम्ही नेहमी तुमचा सोबत आहोत, कोणतीही अडचण असो, तुम्ही आम्हाला हाक देत जा, त्याला साद द्यायला आम्ही सर्वजणी नेहमी तुमच्या सोबत भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभ्या आहोत. या मुलींच्या सोबत आज आम्ही वेळ घालवला त्यामुळे आम्हला पण खूप आनंद मिळाला असल्याचे प्रतिपादन रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले केले.
दोन दिवसानंतर येणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभुमीवर शिरुर येथील शासकीय मतिमंद मुलींचे वसतिगृह येथे रविवार (दि. 5) रोजी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर सर्व मान्यवर महिलांचा मतिमंद मुलींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी या मुलींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकत होता. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. यावेळी मुख्याध्यापिका स्वाती थोरात, डॉ वैशाली साखरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे, आधार छाया फाऊंडेशनच्या अध्यक्षा सविता बोरुडे, वासल्यसिंधू फाऊंडेशन अध्यक्षा उषा वाखारे, नगरसेविका मनीषा कालेवाऱ, लता नाझिरकर, नीता सतेजा, प्रीती बनसोडे, दिपाली आंबरे, छाया हारदे, लता खराडे, शीतल शर्मा, कर्मचारी संजो, मरसियान अनेक महिला उपस्थित होत्या. यावेळी अधीशिक्षिका यदण्या यांनी सर्वांचे आभार मानले.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…