कारेगाव (तेजस फडके) ढोकसांगवी (ता. शिरुर) येथे जेवणाचे बिल न दिल्याच्या कारणावरुन झालेल्या वादातुन दोघा तरुणांनी एकास शिवीगाळ व मारहाण करुन लोखंडी खुर्ची डोक्यात मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी ढोकसांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी करण चंद्रकांत वाळुंज (वय २४) रा. पाचंगेवस्ती, ढोकसांगवी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला तक्रार दिली असुन हि घटना १० जुन २०२५ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास घडली आहे.
यातील आरोपी अभि माकर व साहिल माकर (पूर्ण नावे अज्ञात, दोघे रा. ढोकसांगवी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी फिर्यादीकडे “आमचे जेवणाचे बिल दे” अशी मागणी केली. मात्र फिर्यादी यांनी त्यास नकार दिल्यानंतर, दोघांनी मिळून त्यांना शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी लोखंडी खुर्चीने त्यांच्या डोक्यात मारुन जखमी केले.
रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार हेमंत इनामे हे करत आहेत.
शिरुर तालुक्यातील पारोडी गावात स्माईल फाउंडेशनकडून डेंग्यूच्या जनजागृतीसाठी आरोग्य कार्यक्रम
न्हावरा फाटा व सतरा कमान चौक येथे सौर ऊर्जेवर चालणारे सिग्नल बसवले
उरळगाव येथे ऊस पिक परिसंवादाचे कृषी विभाग व ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…