शिरुर तालुक्यातील पारोडी गावात स्माईल फाउंडेशनकडून डेंग्यूच्या जनजागृतीसाठी आरोग्य कार्यक्रम

आरोग्य मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे) पारोडी, सातकरवाडी, शिवतक्रार व म्हळुंगी गावातील नागरिकांमध्ये डेंग्यू विषयी जनजागृती करण्यासाठी स्माईल फाउंडेशन, दिल्ली व फिलिप्स शिरुर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष आरोग्य जनजागृती कार्यक्रम नुकताच पार पडला.

या कार्यक्रमात कम्युनिटी मोबिलायझर प्रियांका मोहिते यांनी डेंग्यू आजाराच्या लक्षणांपासून ते प्रतिबंधात्मक उपायांपर्यंत सविस्तर माहिती दिली.त्या म्हणाल्या की, डेंग्यू हा एडीस डासांद्वारे पसरणारा विषाणुजन्य आजार असुन याच्या लक्षणांमध्ये उच्च ताप, डोकेदुखी, डोळ्यांमागे वेदना, स्नायू आणि सांधेदुखी, मळमळ व त्वचेवर पुरळ दिसून येतात.

यासाठी प्रतिबंधक उपायांमध्ये साचलेल्या पाण्याचे नियमित निर्जंतुकीकरण, पाण्याच्या टाक्या, भांडी झाकणे, खिडक्यांना जाळ्या बसवणे, लांब बाह्यांचे कपडे घालणे, कीटकनाशकांचा वापर,मच्छरदानीचा वापर करणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्माईल फाउंडेशनचे वरिष्ठ स्वास्थ्य व्यवस्थापक अमिल यांच्या सूचनेनुसार आणि सामुदायिक आरोग्य अधिकारी के एम सोनटक्के यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यावेळी अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

उल्लेखनीय; महिलांचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या एका अट्टल चोराला अटक १० लाखांचे सोने हस्तगत

Video; शेतात जायला रस्ताच नसल्याने पाच एकर द्राक्षबाग तोडण्याचा शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय

उरळगाव येथे ऊस पिक परिसंवादाचे कृषी विभाग व ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने आयोजन