आरोग्य

हे ५ पदार्थ वाढवतात कफाचे प्रमाण हेल्दि घशासाठी हे पदार्थ खाणे टाळा

कफ झाला की एक वेळ खोकला परवडला पण कफ नको. असं म्हणायची वेळ येते. कारण सतत ठसका लागत राहतो. धास लागत राहते. कफ जाता जात नाही. डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेतले तरी परत येतो. त्याची काही कारणे आहेत. ती कारणे म्हणजे आपण खातो ते अन्न. काही पदार्थ कफ वाढवतात. असे पदार्थ पौष्टिकही असू शकतात. पण ज्यांना वारंवार कफाचा त्रास होतो, त्यांनी असे पदार्थ टाळणेच योग्य.

असे पाच पदार्थ आहेत ज्यांचे आपण सतत सेवन करतो. आणि त्यामुळे कफ वाढतो. जाणून घ्या कोणते पदार्थ आहेत.

1) दही शरीरासाठी चांगले असले तरी ते थंड असते. ज्यांना वारंवार सर्दी, खोकला , कफ होतो अशा लोकांनी दही खाणे टाळा.

2) अनेकांना तिखट पदार्थ खाण्याची आवड असते. पण तिखट पदार्थांमुळे घशाला त्रास होतो. त्यामुळे कफ, खोकला होतो. तिखट पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करा.

3) गार पेये प्यायला सगळ्यांनाच आवडतात. पण गार पेये घशासाठी चांगली नाहीत. त्यांच्यामुळे कफच नाही तर सर्दी, खोकलाही वाढतो.

4) तळलेल्या पदार्थांमुळे हमखास कफ वाढतो. असे पदार्थ स्वास्थ्यासाठीही चांगले नाहीत. पदार्थ तळण्यापेक्षा कमी तेलात शॅलो फ्राय करा.

5) कोणत्याही प्रक्रियेतून गेलेले अन्न म्हणजेच पॅकेट फूड घशासाठी चांगले नाही. त्यात भरपूर रसायनयुक्त मीठ आणि प्रिझर्वेटिव्ह असतात. असे पदार्थ खाणे टाळा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

7 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

10 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

12 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago