शिरूर (अरुणकुमार मोटे): “तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले,” असा जाब विचारत एका तरुणाला रस्त्यात अडवून पाच जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना शिरूर शहरातील वात्सल्य हॉस्पिटलसमोर घडली. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतिषकुमार जयप्रकाश सिंग (वय २६, रा. सुंदरसृष्टी, शिरूर, मूळ रा. बलिया, उत्तर प्रदेश) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मंगळवारी (ता. १७) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते घरी जात असताना शशिकांत गायकवाड (रा. शिक्रापूर) व त्याच्या चार अनोळखी साथीदारांनी त्यांना अडविले.
यावेळी “तुझ्यामुळे मला कंपनीतील नोकरी गमवावी लागली,” असा आरोप करत पाचही जणांनी संगनमताने फिर्यादीस शिवीगाळ केली. त्यानंतर हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून परिसरात दहशत निर्माण केली. तसेच “गर्दीपासून दूर नेऊन तुला धडा शिकवू,” अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये शशिकांत गायकवाड व त्याच्या चार अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप पुढील तपास करीत आहेत.
गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे चिंता
शिरूर शहर व तालुक्यात खून, हाणामारी, चोरी आणि दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर आणि प्रभावी कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…