आरोग्य

कावीळ झाल्यावर सपोर्टीव ट्रीटमेंट म्हणून खालील घरगुती उपाय अवश्य करावेत

कावीळ हा आजार एक धोकादायक आजार आहे ज्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर तो जीवघेणा देखील ठरू शकतो. कावीळचे विविध प्रकार आहेत पण आम्ही येथे कोणत्याही प्रकारच्या कावीळ वर केले जाणारे घरगुती उपाय सांगितले आहेत. हा आजार होण्याचे कारण दुषित भोजन केल्यामुळे आणि दुषित पाणी पिण्यामुळे होतो. हा आजार जास्त तेलकट पदार्थ तसेच शिळे अन्न वरचेवर खाल्ल्यामुळे होतो. या आजारात रुग्णाच्या शरीरात रक्ताची कमी होते. शरीरामध्ये रक्ताची कमतरता झाल्यामुळे रुग्णाचे पूर्ण शरीर पिवळे दिसायला लागते. या रोगा मध्ये रुग्णाचे डोळे पिवळे पडतात आणि लघवी पण पिवळी होते. या आजारात रक्तामध्ये दुषित द्रव मिक्स होऊन अनेक प्रकारचे आजार उत्पन्न होऊ शकतात. यामध्ये लिवर सुजणे आणि भूक कमी लागणे या समस्या होतात.

कावीळ म्हणजे ज्याला हिंदी मध्ये पिलिया म्हणतात हा आजार लीवर (यकृत) च्या संबंधातील आजार आहे. कावीळ एक साधारण आजार वाटतो पण जर याचे वेळीस उपचार केले गेले नाही तर हे भयंकर रूप धारण करू शकते यामध्ये रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला या जीवघेण्या आजारासाठी घरगुती उपाय सांगत आहोत. जे तुमच्या काविळीला बरी करण्यास उत्तमा ठरेल. हा उपचार कावीळ मग तो हेपेटाइटिस A, B, किंवा C किंवा मंग बिलरुबिन, ESR वाढलेले असेल तरीही फायदेशीर राहील.

काविळी पासून सुटका मिळवण्यासाठी सोप्पे घरगुती उपाय

शहाळे (हिरवे नारळ): रोज दिवसातून कमीतकमी 2 शहाळेचे पाणी प्यावे, या नारळाचे ताजे पाणी प्यायचे आहे म्हणजे ते फोडल्यावर लगेच त्याचे पाणी प्यायचे आहे. असे 3-5 दिवस केल्यानंतर तुम्हाला निरोगी झाल्याचा अनुभव येईल. संपूर्ण दिवस त्याला फक्त नारळ पाणी वरच ठेवा. हा उपाय अनेक रुग्णांना फायदेशीर ठरला आहे. लिवर मध्ये होणाऱ्या कोणत्याही आजारासाठी हा प्रयोग निसंकोच केला जाऊ शकतो.

कांदे: कावीळच्या इलाजामध्ये कांद्याला विशेष महत्व आहे. सर्वात पहिले एक कांदा सोलून त्याचे पातळ-पातळ तुकडे करून यामध्ये लिंबू पिळणे त्यानंतर यामध्ये थोडी काळीमिरी पावडर आणि काळे मीठ मिक्स करून दररोज सकाळ-संध्याकाळ सेवन केल्यामुळे कावीळ लवकरात लवकर बरी होण्यास मदत होते.

चण्याची डाळ: रात्री झोपण्या अगोदर चण्याच्या डाळीला भिजत ठेवा. पहाटे उठून भिजलेल्या डाळीचे पाणी काढून त्यामध्ये थोडेसे गुळ मिक्स करा. हा उपाय दररोज एक ते दोन आठवडे केल्यामुळे कावीळ बरी होण्यास मदत होते.

सुंठ: सुंठ चा वापर करून देखील कावीळचा उपचारामध्ये केला जाऊ शकतो. यासाठी सुंठ 10 ग्राम, गुळ 10 ग्राम घ्यावा. ही सामग्री एकत्र करून सकाळी थंड पाण्यासोबत खाण्यामुळे कावीळी पासून सुटका होण्यास मदत होते.

लसून: कावीळी मध्ये लसून देखील फायदेशीर आहे. यासाठी कमीतकमी 4 लसून कुड्या घ्याव्यात आणि त्यांना सोलून त्यांना बारीक वाटावे त्यामध्ये 200 ग्राम दुध टाकावे. आणि रुग्णाने रोज हे खाण्यामुळे कावीळ मुळा सकट संपून जाण्यास मदत होते.

चिंच: चिंच रात्री झोपण्या अगोदर पाण्यात भिजत ठेवावी सकाळी चिंच व्यवस्थित पाण्यात पिळून काढावी आणि या पाण्यात थोडी काळीमिरी पावडर आणि थोडे काळेमीठ मिक्स करून प्यावे. दोन आठवडे हे पिण्यामुळे कावीळ ठीक होण्यास मदत होते.

मध आणि आवळा रस: एक चमचा मध घ्यावे त्यामध्ये 50 ग्राम ताज्या हिरव्या आवळ्याचा रस मिक्स करून दररोज सकाळी कमीतकमी तीन आठवडे खाण्यामुळे कावीळ पासून सुटका मिळण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

7 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

10 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

10 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

10 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

10 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

11 तास ago